Nashik Crime  saam Tv
महाराष्ट्र

Crime: चिकन खाण्यासाठी हट्ट, संतापलेल्या आईने मुलाच्या डोक्यात लाटणं मारलं; ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Nashik Crime: पालघरमध्ये आईने आपल्या मुलाची निर्घृण हत्या केली. चिकन खाण्यासाठी हट्ट केल्यामुळे संतापलेल्या आईने मुलाच्या डोक्यात लाटणं मारलं. यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पालघरमध्ये खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • ७ वर्षाच्या मुलाची आईने निर्घृण हत्या केली.

  • चिकन खाण्यासाठी हट्ट केल्याने आई संतापली आणि तिने मुलाची हत्या केली.

  • आईने लाटणं डोक्यात मारल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला.

  • घटनेमुळे परिसरात खळबळ असून पोलिसांनी महिलेला अटक केली.

रूपेश पाटील, पालघर

आईने पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली. चिकन खाण्यासाठी हट्ट केल्यामुळे आईने मुलाचा जीव घेतला. सात वर्षांच्या चिमुकल्याच्या डोक्यात आईने लाटणं घातलं. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला. पालघरच्या धनसार येथील काशीपाडा येथील एका सोसायटीतील घटना आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चिमुकल्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली. ३८ वर्षीय आरोपी महिलेला धनसार येथील घरातून पालघर पोलिसांनी अटक केली. या महिलेविरोधात मुलाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, सांगलीमध्ये नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केली. सांगलीतील शांतीनगर परिसरात ही घटना घडली. झोपलेल्या बायकोवर चाकूने सपासप वार करत तिची हत्या करण्यात आली. घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. बायकोची हत्या करून आरोपी नवरा थेट पोलिस ठाण्यात गेला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. कोमल प्रशांत एडके असं मृत महिलेचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final : पॉवर प्लेमध्ये दुबे, बुमराहकडून गोलंदाजी! फायनलसाठी खास 'प्लान', भारताचा प्रयोग यशस्वी होणार?

Maharashtra Live News Update: नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी 2 हजार 200 कोटींचा पहिला हप्ता मंजूर

Maharashtra Weather: अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

Monday Horoscope : महत्त्वाची जबाबदारी खांद्यावर पडणार, धनलाभ होणार; ५ राशींच्या लोकांना कमाईचा नवा मार्ग मिळणार

IND Vs PAK : टीम इंडियात मोठे बदल! हार्दिक, अर्शदीप बाहेर; कोणाला मिळाली संधी? पाहा Playing XI

SCROLL FOR NEXT