दोन मुलांसह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या!  Saam Tv
महाराष्ट्र

दोन मुलांसह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या!

नेहमीच होणारे पती-पत्नीतील वाद यामागचे कारण असावे, अशी शंका आहे.

संजय तुमराम साम टीव्ही चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहराजवळ असलेल्या मालडोंगरी येथील महिलेने घरगुती वादातून स्वतःच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली. दीपा रवींद्र पारधी ( 33) असे मृतक महिलेचे नाव असून आयुष रवींद्र पारधी (6) पियुष रवींद्र पारधी (3) अशी मृत बालकांची नावे आहेत.

हे देखील पहा :

मालडोंगरी (MaldongarI) येथील रवींद्र मुरलीधर पारधी व त्यांची पत्नी दीपा रवींद्र पारधी, आयुष आणि पियुष ह्या दोन मुलांसह राहत होते. घटनेच्या आधीच्या रात्री पती रवींद्र व पत्नी दीपा यांच्यामध्ये वाद (Disputes) झाल्यामुळे रागाच्या भरात पत्नी दीपा आपल्या दोन मुलांसह घरून निघून गेली. पती रवींद्र याने नातेवाईक-शेजार्‍यांसह शोधाशोध सुरु केली.

आज सकाळी मालडोंगरीकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या शेतातील विहिरीत गावकऱ्यांना दीपा, आयुष व पियुष ह्या तिघांचे मृतदेह तरंगताना दिसून आले. घटनेची माहिती पोलिसांना (police) देण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांच्या सहकार्याने तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. नेहमीच होणारे पती-पत्नीतील वाद यामागचे कारण असावे, अशी शंका आहे. ब्रह्मपुरी पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: -चांदवड टोलनाका अपघात विभागातील ७५ कामगारांच्या नोकरीवर कुऱ्हाड, संतप्त कर्मचाऱ्यांनी सुरु केले साखळी उपोषण

PAN कार्डधारकांसाठी मोठा बदल! पैसे काढण्यासाठी नव्या अटी अन् नवे नियम लागू

सात महिन्यापासून मुलीचा शोध लागेना! हतबल आई-वडिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न

Petrol Pump Business: पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी काय काय लागतं? जाणून घ्या खर्च, शिक्षण आणि वयोमर्यादा

Dhule Crime : दुहेरी हत्याकांडानं धुळे हादरलं! बायकोसमोर अपमान केला म्हणून मुलानं आई-वडिलांची केली हत्या

SCROLL FOR NEXT