Mosque Loudspeaker Controversy saam Tv
महाराष्ट्र

Mosque Loudspeaker Controversy:भाजप मशीदीवरील भोंगे उतरवणार? भोंग्यावरुन महायुतीत राजकारण तापलं

Mosque Loudspeaker: मशिदीवरील अवैध भोंग्यावरुन अजित पवार विरुद्ध भाजप आमने-सामने आलेत. दादांनी भाजपच्या अजेंड्यालाच विरोध केलाय. त्यामुळे राजकारण तापलंय. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

मनसेनंतर आता भाजप मशीदीवरील अवैध भोंगे उतरवण्यासाठी मैदानात उतरलंय. मशीदीवरील अवैध भोंग्यांवर कारवाईची मागणी जोर धरतेय. त्यामुळे अवैध भोंग्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. तर भाजपच्या किरीट सोमय्यांनी मुंबईत 1600 मशीदीवरील भोंगे अवैध असल्याचं सांगत ते उतरवणार असल्याचा इशारा दिलाय. त्यामुळे अस्वस्थ मुस्लीम नेत्यांनी अजित पवारांकडे तक्रार केलीय.

तर मुस्लीम नेत्यांच्या तक्रारीनंतर अजित पवारांनी अनधिकृत भोंग्यासंदर्भात बैठक बोलावली. एवढंच नाही तर अजित पवारांनी थेट किरीट सोमय्यांना तंबी दिल्याची चर्चा आहे.अजित पवारांनी नेमकं काय म्हटलंय? पाहूयात.

अजित पवारांची सोमय्यांना तंबी

नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांना आदेश

सोमय्यांच्या दबावात येऊन पोलिसांनी कारवाई करु नये

सोमय्यांनी कुठल्याही मशिदीत जाऊ नये, पोलिसांत जावं

मात्र न्यायालयाच्या निर्णयानुसार सोमय्या भूमिका घेत असल्याने मंत्री आशिष शेलारांनी सोमय्यांची पाठराखण केलीय. त्यामुळे भोंग्याच्या मुद्द्यावरुन महायुतीत राजकारण तापलंय. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेने भोंग्याचा मुद्दा तापवला होता.. तर कोर्टाच्या निर्णयानंतर अनधिकृत भोंगे हटवण्यात आले.

मात्र आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील पक्षच भोंग्याच्या मुद्द्यावर आमने-सामने आलेत.. त्यामुळे पोलीस अजित पवारांचे निर्देश पाळणार की भाजपच्या नेत्यांच्या दबावात कारवाई सुरुच ठेवणार? असा सवाल विचारला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT