Buldhana Saam
महाराष्ट्र

Buldhana: मॉर्निंग वॉकला गेला अन् कारनं उडवले; बँक कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, बुलढाण्यात खळबळ

Hit-and-Run Incident in Buldhana: बुलढाण्यात मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून कारचालक फरार झाला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Bhagyashree Kamble

मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला आहे. एका भरधाव वाहनाने एका बँक कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. ही धक्कादायक घटना बुलढाण्यातील शेगाव शहरातील खामगाव रोडवरील शिवांश सेलिब्रेशनजवळ पहाटेच्या सुमारास घडली आहे. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

महेंद्र श्रीराम सोंडकर (वय वर्ष ५४, रा. अकोला) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. महेंद्र नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले होते. यादरम्यान, एक कार वेगाने येत होती. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाच्या भरधाव वाहनाने सोंडकर यांना जोराची धडक दिली. धडक दिल्यानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला.

महेंद्र हे घटनास्थळी बेशुद्ध होऊन पडले. ते रक्तबंबाळ झाले. परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हिट अँड रन घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच सोंडकर कुटुंबात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यासह आरोपीला तातडीने अटक करून शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही सोंडकर कुटुंबाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT