honey bee attack Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: कुणाच्या चेहऱ्यावर तर, कुणाच्या डोक्यावर मधमाशांनी मारला डंक; शाळकरी विद्यार्थ्यांवर मधमाशांचा अ‍ॅटक

Students injured in bee attack: काही शाळकरी विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात २० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत.

Bhagyashree Kamble

धुळ्यातील साक्री येथील काही शाळकरी विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात २० हून अधिक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. मधमांशाच्या तावडीतून सामाजिक कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांची सुटका केली. तसेच त्यांना तातडीनं खासगी रूग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

काही शाळकरी विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात २० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. हे विद्यार्थी साक्री शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयातील असल्याची माहिती समोर आली आहे. शाळेच्या आवारात असलेल्या निंबाच्या झाडावर आणि शाळेच्या खिडक्यांवर मधमांशांचा पोळा होता.

काही मधमाशी पोळ्यातून बाहेर आल्या आणि थेट विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण डोक्यावर मधमाशांनी चावा घेतला आहे.

मधमांशांच्या या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. मधमांशांच्या तावडीतून सामाजिक कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. यानंतर जखमी विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: लहानपणी KBC मध्ये १ कोटी जिंकले, MBBS केलं, नंतर क्रॅक केली UPSC; IPS रवि मोहन सैनी यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: गॅस वितरणासाठी पोलीस संरक्षण देण्याची एजन्सी चालकांची मागणी

Friday Horoscope: आजच्या कामाच्या ठिकाणी कौतुक होईल, वाचा आजचं राशीभविष्य

Iran-US War: आखातातील युद्ध थांबणार? इराणच्या 3 अटी अमेरिकेला मान्य?

Friday Horoscope : प्रमोशन ते प्रेमापर्यंत सगळ्या इच्छा पूर्ण होणार; ५ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार

SCROLL FOR NEXT