Load Shedding, Man taluka news Updates, Satara News Updates Saam Tv
महाराष्ट्र

माण तालुक्यातील 10 पेक्षा जास्त गावे 20 तासांपासून अंधारात

40 विद्युत खांब पडल्यामुळे 20 तासांपासून लाईट गायब

ओंकार कदम

सातारा - दोन दिवसांपूर्वी सातारा (Satara) जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यात वादळी वरा आणि मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली. या वेळी सोसाट्याच्या वाऱ्याने जांभुळणी, गंगोती, विरळी, वळई, पानवन, शिराताव,पुळकोटी, काळचौंडी, महाबळेश्वर वाडी,वरकुटे मलवडी,शेणवडी या गावातील संपूर्ण लाईटची व्यवस्था कोलमडून पडली आहे. (Satara News Updates)

हे देखील पहा -

या गावांमध्ये असलेले जवळ जवळ 40 विद्युत खांब पडल्यामुळे 20 तासांपासून लाईट गायब आहे. गावातील लोकांच्या मध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.गावात लाईट च नसल्याने सर्वांची मोठी गैरसोय झाली आहे. गावातील लोकांच्या मोबाईलला चार्जिंग नसल्याने आता अख्या गावच्या लोक नॉट रिचेबल झाले आहे.

काल संध्यकाळी महामंडळाचे कर्मचारी गावात दाखल झाले त्यांनी नुकसान झालेल्या ठिकाणी पडलेले लाईटचे खांब पूर्ववत करण्याचे काम सुरू केले आहे. गावातील लाईट गेल्याने आता बळीराजा सुधा हतबल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आता पुन्हा एकदा डोकं धरून बसायची वेळ आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद टोकाला

Nashik TCS Case : लैंगिक शोषण अन् अश्लील टोमणे...; नाशिकच्या TCS धर्मांतर प्रकरणात २० तरुणींनी सांगितली आपबीती

Chanakya Niti Tips: 'या' 4 ठिकाणी दान केल्यास व्हाल मालामाल, चाणक्यांनी सांगितले झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग

Ladki Bahin Yojana: १२००० पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; २३ कोटी रुपये लाटले; धक्कादायक माहिती उघड

Ranveer Singh : बॉलिवूडचा 'धुरंधर' झाला कास्टिंग काउचचा शिकार, किस्सा वाचून अंगावर येईल काटा; म्हणाला - 'प्रोड्यूसरने मला पार्टीला बोलावले अन्...'

SCROLL FOR NEXT