Dhangar Reservation saam tv
महाराष्ट्र

Dhangar Reservation : मुदतीत आरक्षण द्या अन्यथा उद्रेकास सामाेरे जा : धनगर समाजाचा सरकारला इशारा

धनगर समाजाच्या आरक्षणाला खासदार-आमदारांनी आणि नेत्यांनी पाठिंबा द्यावा अशी मागणी आंदाेलकांनी केली आहे.

विजय पाटील

Sangli News : शासनाने दिलेल्या मुदतीत आरक्षण मिळाले नाही तर धनगर समाजाचा उद्रेक होईल त्याला सर्वस्वी शासन जवाबदार राहील असा इशारा समस्त धनगर समाजाच्या वतीने आज (साेमवार) सांगली येथे देण्यात आला. धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) अंमलबजावणीसह विविध मागण्यासाठी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे धनगर समाजाने भव्य धडक मोर्चा काढला. (Maharashtra News)

शहरातील भिलवडी नाका इथून तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये पारंपारिक वाद्य,शेळ्या मेंढ्यासह हजारो धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. तसेच मराठा आरक्षण प्रमाणे धनगर समाजाच्या आरक्षणाला ही खासदार-आमदारांनी आणि नेत्यांनी पाठिंबा द्यावा,व आरक्षणाच्या बाबतीत भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

मराठा समाजाप्रमाणे धनगर समाज देखील आरक्षण मिळे पर्यंत गावागावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करणार असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. तसेच मुदतीत आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास राज्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी सांगली जिल्हा धनगर महासंघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा; चंद्रकांत पाटील यांची मागणी| नेमके प्रकरण काय? VIDEO

Maharashtra Live News Update: - मुंबई महापालिका निवडणूकीसाठीच्या मतदारयादीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई; एनकाउंटरमध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा, DRG जवान शहीद

Virat Kohli Century: विराट कोहलीचं सलग दुसरं शतक, गौतम गंभीरची रिअ‍ॅक्शन व्हायरल

Vasai-Virar: वसई-विरारमध्ये भाजपची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT