buldhana news, water supply, sindhkhed raja saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : सिंदखेडराजा पालिकेवर पाण्यासाठी नागरिकांचा कळशी, घागर मोर्चा

sindhkhed raja palika : जिजामाता नगरात पाण्याचा ठणठणाट आहे.

संजय जाधव

Buldhana News : सिंदखेडराजा (sindhkhed raja) शहरात सध्या अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे अनेक भागांत पाणी विलंबाने येत असल्याची ओरड होत आहे. जिजामाता नगरातील नवीन जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण होऊन दोन महिने झाले मात्र या भागातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी नगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढला. (Maharashtra News)

शहरातील अंतर्गत जलवाहिनी बदलण्यासाठी जवळपास २९ कोटी रुपयांची योजना मंजूर झाली. दरम्यान, या योजनेचे काम सुरू झाले असून शहरात अनेक प्रभागात नाली खोदकाम करून जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू आहे.

जिजामाता नगरात हे काम पूर्ण झाले आहे. मेन लाइनची जोडणी झाली नसल्याने सिंदखेडराजा येथील नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढून रोष व्यक्त केला. येत्या दाेन ते तीन दिवसांत सुरळीत पाणी पुरवठा केला गेला नाही तर उग्र आंदोलन करून असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: अमरावतीत युवक काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT