Rain News Maharashtra Marathi Saam TV
महाराष्ट्र

Heavy Rain Alert : सावधान! आज दुपारनंतर तुफान पाऊस बरसणार; IMD कडून कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट? वाचा...

Rain News in Maharashtra Today : आज दुपानंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यापार्श्वभूमीवर भागात पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आलाय.

Satish Daud

गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी पहाटेपासून विश्रांती घेतली. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून रस्त्यावरील साचलेले पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर रेल्वे तसेच रस्ते वाहतूक देखील सुरळीत आहे. मात्र, आज दुपानंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यापार्श्वभूमीवर भागात पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आलाय.

महाराष्ट्रात आज कुठे-कुठे पाऊस?

भारतीय हवामान खात्याने आज मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा (Marathwada Rain News) अंदाज आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच नागपुरात पावसाची शक्यता आहे.

मुंबईसह उपनगराला पावसाचा इशारा

मुंबईसह उपनगराला देखील आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत दुपारपासून पावसाचा जोर (Mumbai Rain Alert) वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. पुढील काही तासांतच कोकणाला देखील तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीतील खेड तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस (Konkan Heavy Rain) झाल्याने जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पावसाचा फटका कोकण रेल्वे सेवेला

या पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसलाय. काही ठिकाणी ट्रॅकवर माती आल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे. यामुळे अनेक गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या असून काही एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून सध्या प्रशासनाकडून रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

Vice president Election : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार ठरला; भाजप अध्यक्षांकडून नाव जाहीर

Accident : भीषण अपघात! कार-एसयूव्हीच्या धडकेत लागलेल्या आगीत ७ जण जिवंत जळाले

SCROLL FOR NEXT