Maharashtra Weather Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather : मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, राज्याला ४ दिवस मुसळधार, मुंबई-पुण्याला अलर्ट

Maharashtra Mumbai Rain News : दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. पुढील चार दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

रविवारी मान्सूनने तळकोकणात वर्दी दिली होती. आज मान्सून मुंबईत पोहचला असून दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. आज सकाळपासून मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक शहरांमध्ये मोठा पाऊस पडतोय. पुढील ४ दिवस मुंबई मध्ये पाऊस कायम राहील मात्र त्याची तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. पुणे शहरात आज सकाळपासून आभाळ होतं आणि त्यानंतर आज पुणे शहरात संततधार पावसाला सुरुवात झाली. शहरात आज येलो अलर्ट असून राज्यातील पुढील ४ दिवसात राज्यातील सर्व जिल्ह्यात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे

येत्या ५ दिवसात मॉन्सून सर्व राज्यात पोचणार असून पुढील ४ दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून शहराला यलो अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ आल्याने मान्सून राज्यात लवकर दाखल झाला असल्याची माहिती पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी दिली आहे.

मान्सून पुण्यापर्यंत पोहचला -

रविवारी तळ कोकणात मान्सून दाखल झाला. आज मुंबईत देखील मान्सून आला आहे. पुणे सोलापूर मध्ये देखील मान्सून आज दाखल झाला आहे. मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ४ दिवस मुंबईत धो धो पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवसासाठी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्याला अलर्ट -

मान्सून यंदा लवकर आला आहे. प्रत्येकवर्षी मान्सून ८ जून रोजी दाखल होतो. राज्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. बारामती मध्ये १३० मिली पाऊस झाला आहे. मोठ्या पावसाची नोंद इथ झाली आहे. येणाऱ्या ४ दिवस पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर शहराला येलो अलर्ट देण्यता आला आहे.

पुढील ५ दिवस राज्यात कोसळधारा -

येणाऱ्या ५ दिवसात मान्सून संपूर्ण राज्यात दाखल होईल. कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रालाही ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील सर्व नियोजन व्यवस्थित करावं , कृषी विभागाने दिलेल्या गाईडलाइन पाळावी, असे सांगण्यात येत आहे. बारामती इंदापूर मध्ये पुढील २ दिवस पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नमाज पठाणावरुन शनिवारवाड्यात आंदोलन

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

Diwali Bad Impact: दिवाळीत 'या' 5 चुका मुळीच करू नका, भोगावे लागतील मोठे परिणाम

IND Vs AUS : रोहित-विराटचा कमबॅक फसला, गिल-अय्यरही फ्लॉप; ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय

SCROLL FOR NEXT