Monsoon arrives in kokan saam tv
महाराष्ट्र

Breaking : कोकणात मान्सून दाखल, पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा

जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणात नैऋत्य मोसमी वारे धडकणार असल्याचा अंदाज वेध शाळेकडून वर्तवण्यात आला होता.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केरळ मध्ये मान्सूनने हजेरी लावली होती. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणात (Konkan) नैऋत्य मोसमी वारे धडकणार असल्याचा अंदाज वेध शाळेकडून वर्तवण्यात आला होता. मात्र, गोव्याच्या किनारपट्टीवर पोहोचलेला मान्सून (Monsoon update) कोकणात दाखल झालाच नाही. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रातही पोहोचला नाही. पण आज १० जूनला अखेर कोकणात मान्सूनच्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून बळीराजाही सुखावला आहे.

राज्यात उन्हाच्या उकाड्यामुळे हैराण आणि तापमानवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. राज्यात काही भागात तापमानातील चढउतारामुळे उकाड्यातही वाढ झाली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी राज्यातल्या अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबई पूर्व उपनगारातही पावसाच्या सरी कोसळल्या. त्यात विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड मध्ये पावसाची दमदार हजेरी लावली. या पावसाचा आनंद घेण्यासाठी बच्चेकंपनीने रस्त्यावर उतरून पावसाचा आनंद घेत फुटबॉल खेळायला आनंद घेतला.

दरम्यान, मुंबई, नवी मुंबईसहित पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीसह पूर्व भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पालघरच्या बोईसर , चिंचणी,मनोर, डहाणू,तलासरी , विक्रमगडसह इतर भागात विजांच्या गडगडाटासह दमदार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. पहिल्या पावसाच्या आगमनाने हवेत गारवा, उकाड्या पासून पालघरवासियांना दिलासा मिळाला आहे. अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. तर ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. मात्र,या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Edited by - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suranache Kaap Recipe : रोज भाजी खाऊन कंटाळलात? झटपट बनवा कुरकुरीत सुरणाचे काप

Maharashtra Politics : मराठीच्या मुद्द्यानंतर आता मनसेचा थेट बीएमसीवर हल्लाबोल; पक्षातील नेत्यांचा थेट 'खळखट्याक'चा इशारा

Maharashtra Live News Update: स्नेहा झंडगे आत्महत्या प्रकरण; आरोपींना १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Solapur News: उसाचं बिल थकलं, युवा शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं, न्यायासाठी कुटुंबियांनी फोडला टाहो

भरत गोगावले यांचा पुन्हा पत्ता कट; १५ ऑगस्टला रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण|VIDEO

SCROLL FOR NEXT