सोन्याचे आमिष दाखवून लाखांची लूट करणाऱ्या टोळीला अटक Saam Tv
महाराष्ट्र

सोन्याचे आमिष दाखवून लाखांची लूट करणाऱ्या टोळीला अटक

नाशिकमध्ये स्वस्तात सोनं देण्याचं आमिष दाखवून एका डाळिंब व्यापाऱ्याची 75 लाख रुपयांची लूट करणाऱ्या तिन जणांच्या टोळीला अवघ्या 48 तासात अटक करण्यात नाशिक पोलिसांना यश आल आहे.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजीत सोनवणे

नाशिक : नाशिकमध्ये Nashik स्वस्तात सोनं देण्याचं आमिष दाखवून एका डाळिंब व्यापाऱ्याची 75 लाख रुपयांची लूट करणाऱ्या तिन जणांच्या टोळीला अवघ्या 48 तासात अटक करण्यात नाशिक पोलिसांना Police यश आल आहे. विशेष म्हणजे आरोपींनी लूटलेली 75 लाखांची रोख रक्कमही पोलिसांनी हस्तगत केली आहे. Money laundering gang arrested in nashik

या चोरांनी नाशकातल्या डाळिंब व्यापाऱ्याची फसवणूक करून तब्बल 75 लाख रोख रक्कमेची लूट करून पोबारा केला होता. मात्र नाशिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या 48 तासात या भामट्यांना अटक करण्यात यश आलं आहे. नाशिकच्या एका डाळींब व्यापाऱ्याला मुंबईच्या एका कस्टम अधिकाऱ्यांचं अडीच किलो सोनं 75 लाख रुपयांत देण्याचं आमिष या टोळीनं दाखवलं होते.

हे देखील पहा -

त्यांनंतर या व्यापाऱ्याचा Merchant त्यांनी विश्वास संपादन केला. पेठरोडवरील फळ मार्केटमध्ये व्यापाऱ्याला अडीच किलो सोनं देऊन व्यापाऱ्याकडून 75 लाखांची रोख रक्कम घेऊन ही टोळी पसार झाली. मात्र संबंधित व्यापाऱ्याने सराफाकरवी सोन्याची Gold शुध्दता तपासली. शुध्दता तपासली असता ते सोन बोगस असल्याचं निष्पन्न झाले. यानंतर संबंधित व्यापाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवत 75 लाख रुपयांच्या रोख रकमेसह तिघा आरोपींना अटक केली.

स्वस्तात सोनं अथवा इतर आमिष दाखवून फसवणुकीचे आणि लुटीचे अनेक प्रकार याआधी अनेकदा उघडकीस आलेत. अशा भामट्यांच्या जाळ्यात न अडकण्याचं आवाहनही वेळोवेळी पोलिसांकडून करण्यात येतं. मात्र तरीही अशा भामट्यांच्या भूलथापांना बळी पडून कपाळावर हात मारून घेण्याची वेळ अनेकांवर येते. नाशिकच्या या प्रकरणात पोलिसांनी वेळीचं गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असल्या, तरी यापुढे असे फसवणुकीचे प्रकार घडू नये, यासाठी नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai - Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचं काम अपूर्ण; टोल नाके मात्र पूर्ण, शरद पवार गट आक्रमक | VIDEO

Shravan Somvar Vrat: श्रावणी सोमवारच्या उपवासाला काय खावे अन् काय खाऊ नये

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Safe Dating Tips: डेटिंग अ‍ॅपवर भेटलेल्या व्यक्तीसोबत डेटला जाताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा

PF: नोकरी बदलली? PF अकाउंट कसं ट्रान्सफर करायचं? ऑनलाइन स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT