Beed: धक्कादायक! अतिवृष्टीत हतबल शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी केली जातेय पैशांची मागणी.! SaamTvNews
महाराष्ट्र

Beed: धक्कादायक! अतिवृष्टीत हतबल शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी केली जातेय पैशांची मागणी.!

हेक्टरी 2 हजार द्या; अन्यथा पंचनामा करणार नाही, बीडच्या वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांचा धक्कादायक आरोप; विमा कंपन्या आणि कृषी विभागातील सरकारी बाबूंकडून शेतकऱयांना त्रास?

विनोद जिरे

बीड : बीड (Beed) जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहा:कार केल्याने, जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला आहे. याच हतबल झालेल्या शेतकऱ्यांना पिकांसह जमिनीचे पंचनामे करण्यासाठी पैशाची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक आरोप, बीडच्या वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्याचं (farmers) प्रचंड नुकसान झालं आहे. तर, वाहून गेलेल्या पिकासह, शेतीचे पंचनामे करायचे सोडून पंचनामे करण्यासाठी विमा कंपन्या एजंटमार्फत हेक्टरी 2 हजार रुपये मागत असल्याचा धक्कादायक प्रकार साम टिव्हीने समोर आणला आहे.

हे देखील पहा :

अगोदरच अतिवृष्टीने (Heavy rain) उध्वस्त झालेला शेतकऱ्याला लुटणारे विमा कंपन्यांचे (Insurance Companies) अधिकारी आणि कृषी विभागाचे अधिकारी कोण? असा सवाल उपस्थित झाला आहे. बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका वडवणी तालुक्यातील 42 गावांना बसलेला आहे. या गावात मोठ्या प्रमाणात शेतजमीन, विहिरी, रस्ते आणि पूल वाहून गेलेले आहेत. यातच खरीपातील सोयाबीन, ऊस, कापूस, मूग, उडीद या पिकांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे.

आपत्ती मधून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून पंतप्रधान पिक विमा योजना राबवली जाते. यात शेतकरी प्रीमियम देखील भरतात मात्र पंचनामा करतेवेळी विमा कंपनी आणि कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना हेक्‍टरी 2 हजार रुपये मागितले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडवणी तालुक्यातील कोठारबन, चिखल बीड, यासह पिंपळटक्का या गावातील शेतकऱ्यांना, विमा कंपनीचे कृषी विभागाने नेमलेले एजंट, दोन हजार रुपये मागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे गटाला पश्चिम महाराष्ट्रात धक्का; माजी मंत्र्यांच्या बंधूंचा तडकाफडकी राजीनामा; पत्रात सांगितली मनातली खदखद

Home Vastu Tips: घराच्या पायऱ्यांखाली कोणत्या वस्तू ठेवू नयेत? त्रास होण्याची शक्यता

ज्या मुलाला दत्तक घेतलं, त्याच्याच बायकोनं वृद्ध सासूला मध्यरात्री रस्त्यावर सोडलं

Bike Stunt : 'मौत का कुआ'मध्ये स्टंटबाजी करताना भीषण अपघात, तरुण १५ फूट खाली पडला; घटनेचा थरारक Video Viral

Maharashtra Live News Update: लातूरच्या औसा रुग्णालयाच्या शासकीय रुग्णवाहिकेला भीषण आग

SCROLL FOR NEXT