Crime News, jalna, chandanzira police station Saam TV
महाराष्ट्र

Jalna Crime News : चिमुरडीला आडोशाला घेत नराधमाचे घृणास्पद कृत्य, महिलांनी पाहताच केला आरडाओरडा... ताेपर्यंत सगळं संपलं...

लक्ष्मण सोळुंके

Jalna News : तीन वर्षाच्या चिमुरडीवर 55 वर्षीय नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रात्रीच्या सुमारास उघड झाली होती. यामुळे शहरातील गुलशन नगर परिसरात एकच खळबळ उडाली हाेती. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संशयिताच्या घराची ताेडफोड केली. संशयिताविरुद्ध बलात्काराचा तसेच पोक्सो कायद्यांतर्गत चंदनझिरा पोलिस ठाण्यात (chandanzira police station) गुन्हा नाेंदविल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

शहरातील गुलशन नगर परिसरात एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर 55 वर्षाच्या नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयन्त केल्याची घटना घडली. या अत्यंत धक्कादायक घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. शेख समीर शेख अब्दुल (राहणार. शनल नगर) असे संशयिताचे नाव असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

दरम्यान या घटनेची माहिती समोर येताच परिसरातील नागरीकांनी शेख याच्या घराची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून त्याला बेदम मारहाण केल्याची चर्चा आहे.

शेख समीर शेख अब्दुल यांच्या सोबत दररोज परिसरातील लहान मुलं खेळत होती. नेहमी प्रमाणे आज ही त्याच्या सोबत मुलं खेळत असताना अचानक पावसाची रिमझिम सुरु झाल्याने त्यामुळे काही मुलं आपल्या घरी पळून गेली. त्याचं वेळी या नराधमाने एका तीन वर्षीय चिमूरडीला आडोशाच्या ठिकाणी येऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असे काही महिलांच्या लक्षात आले.

संबंधित महिलांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक त्या ठिकाणी धावून आले. धावून आलेल्या नागरिकांनी नराधमाच्या तावडीतून मुलीची सुटका केली. या नाराधमाला चोप देत घटनेची माहिती चंदनझिरा पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याला उपचारसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तर चिमुरडीला महिला बाल रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

दरम्यान रात्री उशिरा चिमुरडीवर उपचारा दरम्यान मेडिकल अहवालात बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रात्री उशिरा नातेवाईकांच्या तक्रारी वरून संशयिताच्या विरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत चंदनझिरा पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT