ncp leader nalsab mulla, sangli saam tv
महाराष्ट्र

NCP कार्यकर्ता हत्या प्रकरण, 13 संशयितांवर माेक्काची कारवाई

१७ जून रोजी गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून नालसाब मुल्ला याचा खून करण्यात आला होता.

विजय पाटील

Sangli News : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि बाबा ग्रुपचा अध्यक्ष नालसाब मुल्ला यांच्या खून प्रकरणातील १३ संशयितांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मोक्काअंतर्गत कारवाईला मंजुरी देण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मोक्काअंतर्गत कारवाई झालेल्यांमध्ये टोळी प्रमुख स्वप्नील संतोष मलमे (वय २०, रा. खरशिंग, ता. कवठेमहांकाळ), सनी सुनील कुरणे (२३, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर), विशाल सुरेश कोळपे (२०, लिंबेवाडी, रांजणी, ता. कवठेमहांकाळ), सचिन विजय डोंगरे (गुलाब कॉलनी, सांगली), प्रशांत ऊर्फ बबलू संभाजी चव्हाण (२३), रोहित अंकुश मंडले (२२, दोघेही खरशिंग) यांचा समावेश आहे.

याबराेबरच ऋतिक बुद्ध माने (२२, कोकळे, ता. कवठेमहांकाळ), विक्रम तमान्ना घागरे (२२, रा. ढालगाव, ता. कवठेमहांकाळ), प्रवीण अशोक बाबर (रा. आलेगाव, ता. सांगोला), अक्षय बाळासाहेब शेंडगे (रा. कलानगर, सांगली),अवधूत सुनील पानबुडे (रा. नळभाग,सांगली), रोहित बाबासाहेब धेंडे आणि अल्पक राजकुमार कांबळे (दोघेही रा. एरंडोली, ता. मिरज) यांचा देखील समावेश आहे.

यातील धेंडे आणि कांबळे हे दोघे अद्यापही पसार आहेत. १७ जून रोजी गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून नालसाब मुल्ला याचा खून करण्यात आला होता अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'ब्लू' टी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर, कधी आणि कसं प्यावे जाणून घ्या

Idli Bhaji Recipe : उरलेल्या इडलीपासून बनवा कुरकुरीत भजी, घरच्यांना आवडेल ही हटके रेसिपी

Coronary artery disease: तुमचं ब्लड प्रेशर नेहमी नॉर्मल; तरीही हृदयातील ब्लॉकेजचा धोका कसा ओळखायचा? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai-Pune Train: पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा, १० दिवसांनतर रेल्वे रूळावर; कोणकोणत्या ट्रेन सुरू झाल्या?

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

SCROLL FOR NEXT