Mokhada News Saam tv
महाराष्ट्र

Mokhada News : गोणीत बांधलेल्या स्थितीत आढळला तरुणीचा मृतदेह; हत्या करून फेकल्याचा संशय, पोलिसांकडून तपास सुरु

Palghar News : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील नाशिक- मोखाडा- जव्हार या मार्गावरील घाटकरपाडा येथील वाघ नदीत एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे.

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
मोखाडा (पालघर)
: नाशिक- मोखाडा- जव्हार मार्गावर असलेल्या वाघ नदीत आज सकाळच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. गोणीमध्ये बांधून फेकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून सदर तरुणीची हत्या करून नदीत फेकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील नाशिक- मोखाडा- जव्हार या मार्गावरील घाटकरपाडा येथील वाघ नदीत एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. तिचा मृतदेह हा एका सुतळी गोणीत भरून वाघ नदीच्या पुलावरून खाली फेकून दिला आहे. परिसरातील नागरिकांना हा मृतदेह आढळून आल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आहे. 

हत्या केल्याचा संशय    

सदर तरूणीला गळफास देऊन तिची हत्या करून या ठिकाणी फेकण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या तरुणीचे वय अंदाजे २५ वर्षे असून अंगावर पिवळ्या रंगाचा टॉप व सफेद रंगाची लैगिज असून याबाबत मोखाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोल व कर्मचारी तपास करत आहेत. अद्याप तरूणीची ओळख पटली नसून या मृतदेहाची प्रथामिक तपासणी करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे.

मोखाडा तालुक्यात खळबळ 

दरम्यान मोखाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाघ नदी जवळ एका अनोळखी तरुणीचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेतील मृत तरुणी हि राहणार कुठली, नाव याची काहीही माहिती अद्याप पोलिसांकडे नाही. या अनुषंगाने प्रथम सदर तरुणी कोण याचा तपास पोलीस घेत आहेत. यानंतर तिची हत्या कोणी व कोणत्या कारणासाठी केली? याचा तपास केला जाणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT