latur, bullet silencer
latur, bullet silencer saam tv
महाराष्ट्र

'Patakha' Silencers ची क्रेझ अंगलट, 500 वाहनांवर कारवाई; पाच लाखांचे सायलेन्सर जप्त

दीपक क्षीरसागर

Latur News : फटाका, कर्णकर्कश्श सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. कर्णकर्कश आवाज करीत सुसाट धावणाऱ्या वाहनधारकांना लगाम लावण्यासाठी लातूर पोलिसांनी (latur police) विशेष मोहीम हाती घेतली आहे. जवळपास ५०० वाहनांचे पाच लाखांचे सायलेन्सर जप्त करून त्यावर रोलर फिरवला आहे. (Maharashtra News)

लातुरात कारवाई केलेल्या जवळपास ५०० वाहनांचे सायलेन्सर जप्त केले. त्या वाहनधारकांविरोधात दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या पाच लाखांच्या फटाका सायलेन्सरवर पोलिसांनी थेट रोलर फिरवत नष्ट केले.

वारंवार सूचना देण्यात येऊनही काही हौसी वाहन धारकांकडून फटाका, कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर वापरले जात आहेत. याबाबत लातूर शहर वाहतूक शाखा आणि विविध पोलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाई केली जात आहे.

या कारवाईनंतरही काही वाहनधारक मूळ सायलेन्सर वापरत नसल्याचे दिसून आले. अखेर गत महिनाभरात लातूर पोलिसांनी विविध मार्गावर वाहन तपासणी करून फटाका (मॉडिफाय ) सायलेन्सर जप्त केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : भाज्यांचे दर कडाडले, किलोमागे तब्बल ८० रुपयांपर्यंत वाढ; अवकाळी पाऊस आणि उष्णतेचा फटका

Petrol Diesel Rate 5th May 2024: पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या किंमती

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्ट्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी सँडविच घरच्या घरी

Baramati Loksabha: बारामतीत प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! ५० वर्षांनंतर शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान बदललं; दादांनी मारली बाजी

Mumbai News: मुंबईत सापडला बनावट नोटांचा कारखाना; निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT