sandeep deshpande and santosh dhuri  Saam Tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! संदीप देशपांडे आणि संतोष धुरी प्रकरणात कोर्टाने पोलिसांना फटकारलं

MNS Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष यांच्या केस प्रकरणी कोर्टाने पोलिसांना फटकारले आहे

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी (MNS Santosh Dhuri) यांच्या केस प्रकरणी कोर्टाने पोलिसांना (Mumbai Police) फटकारले आहे. ही केस काल्पनिक असून कोणत्याही तथ्यावर आधारीत नाही असं स्पष्टीकरण कोर्टाच्या वतीने देण्यात आलं आहे. आरोपींमुळे इतरांचा जीवाला धोका होता, हा दावा कोर्टाने फेटाळून लावला आहे. ( MNS Sandeep Deshpande And Santosh Dhuri Case Court Slapped Mumbai Police)

जर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे शिवतीर्थावर आले तेव्हाच पोलिसांनी त्यांना का ताब्यात घेतलं नाही असा सवाल देखील कोर्टाने पोलिसांना केला आहे. पोलिसांच्या हाती आरोपी लागले नाही त्यानंतर काल्पनिक केस उभी करण्यात आली असं प्रथमदर्शी दिसून येत आहे असं कोर्टाने यावेळी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध करत ४ मे रोजी पक्षातील कार्यकर्त्यांना मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले होते. राज यांच्या आदेशानंतर ठिकठिकाणी मनसैनिकांनी भोंग्याविरोधात हनुमान चालीसा लावण्यास सुरूवात केली होती. दरम्यान, राज्यभरात पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. याच दिवशी शिवाजी पार्क येथे पोलीस ताब्यात घेत असताना संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी आपल्या खासगी वाहनातून गनिमी काव्याने निघून जात पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. यावेळी झालेल्या गोंधळात एक महिला पोलीस कर्मचारी रस्त्यावर पडून जखमी झाली. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या या दोन्ही नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी दाखल केला होता गुन्हा

दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे मनसेच्या दोन्ही नेत्यांवर अटकेची टांगती तलवार होती. या प्रकरणात पोलिसांनी संदीप देशपांडे यांचा चालक आणि मनसेचे शाखाध्यक्ष संतोष साळी यांना अटकही केली होती. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावर 19 मे रोजी सुनावणी पार पडली होती. त्यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद न्यायालयानं ऐकून घेतला न्यायालयाने संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा जामीन मंजूर केला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss: दररोज सकाळी 'हे' काम केल्याने वजन होईल लवकर कमी, आठवडाभर करुन पाहा हे उपाय

Maharashtra Live News Update : अकोला महापालिकेत महायुती होणार?

Mumbai-pune : मुंबईहून पुणे फक्त ९० मिनिटात अन् बंगळुरू ५ तासात, नव्या एक्सप्रेसची A टू Z माहिती

Accident : ट्रकने दुचाकीला उडवले, बायकोच्या डोळ्यासमोर नवऱ्याचा तडफडून मृत्यू

Flax Seeds Ladoo Recipe : फक्त १५ मिनिटांत बनतील पौष्टिक जवसाचे लाडू, वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT