amravati, mns saam tv
महाराष्ट्र

MNS Morcha : महापालिकेवर धडकले मनसैनिक, समस्या न सुटल्यास खळ्ळखट्याकचा इशारा

Amravati News : आगामी काळात तीव्र आंदाेलन छेडणार असल्याचा इशारा मनसैनिकांनी दिला.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News : अमरावती महानगर पालिकेअंतर्गत येणाऱ्या अमरावती आणि बडनेरा शहरातील विविध समस्या सुटाव्यात यासाठी आज मनसेनं अमरावती महापालिकेवर मोर्चा काढला. या माेर्चात शेकडाे महिला आणि मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. (Maharashtra News)

बडनेरा, अमरावतीची जनता महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे पूर्णतः त्रस्त झाली आहे. जनतेवर मालमत्ता कर, साफसफाई कर असे विविध प्रकारचे कर लादून त्याबदल्यात पुरविल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांबाबत जनतेमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे असे मनसैनिकांनी नमूद केले.

शहरातील साफसफाई स्वच्छता, रस्त्यांवरील खड्डे बाबतीत मनसेने वारंवार आंदोलन केली पण अजूनही अंमलबजावणी झाली नाही. सोबतच घरकुल आणि पीआर कार्डच्या समस्येवर ही आवाज उठवला आहे. दरम्यान या आंदाेलनानंतर परिस्थिती सुधारली नाही तर तीव्र आंदाेलन छेडू असा इशारा मनसैनिकांनी (mns) दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT