Sushma Andhare  Saam tv
महाराष्ट्र

'काही लोक 'कर भाषण घे रेशन तत्त्वावर भाड्यावर घेतलेली आहेत'; मनसेची सुषमा अंधारेंवर सडकून टीका

'काही लोक आहेत ते कर भाषण घे रेशन या तत्त्वावर भाड्यावर घेतलेली आहेत, अशा शब्दात मनसे आमदार राजू पाटील यांनी टीका केली आहे.

प्रदीप भणगे

Raju patil News : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ''आमच्याकडे एक असा पठ्ठ्या आहे, त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’असाच कार्यक्रम असतो'', असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केल्यानंतर मनसे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

'काही लोक आहेत ते कर भाषण घे रेशन या तत्त्वावर भाड्यावर घेतलेली आहेत, अशा शब्दात मनसे आमदार राजू पाटील यांनी टीका केली आहे. (MNS Mla Raju Patil criticize Sushma Andhare)

मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. ''वरचा मजला रिकामा' असा मराठीत वाक्प्रचार आहे, परंतु आमच्याकडे एक सुशी ताई आहेत ज्यांच्या 'वरच्या मजल्यावर' घनदाट 'अंधार' आहे. आपण कधीकाळी कुणाविषयी काय बोललो होतो, हे त्यांना बिलकुल आठवत नाही.आणि त्याच अंधारामुळे त्या वाट्टेल ते बरळत असतात, अशा शब्दात राजू पाटील (Raju Patil) यांनी अंधारे यांच्यावर टीका केली आहे.

राजू पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, ' काही लोक बोलताना कोणत्याही थराला जाऊन बोलत असतात. काही लोक आहेत, ते 'कर भाषण घे रेशन' या तत्त्वावर भाड्यावर घेतलेली आहेत. या लोकांच्या टीकेला महत्व देत नाही, मात्र कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, त्यामुळं वाईट वाटतं म्हणून ट्विट केलं असे सांगितले. मनसे आमदार राजू पाटील यांच्या टीकेनंतर सुषमा अंधारे काय प्रत्युत्तर देणार, हे पाहवे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT