Raju Patil News  Saam tv
महाराष्ट्र

Raju Patil : बाळासाहेबांच्या विचारांशी जो नडला त्याला फोडला; मनसेच्या राजू पाटलांचं आदित्य ठाकरेंना चॅलेंज

मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गट आणि आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Raju Patil News : मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गट आणि आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'शिल्लकांनी नको तिथे बोट खूपसू नये. नाही तर बाळासाहेबांच्या विचारांसोबत नडला, त्याला फोडला ही हिंमतही आमच्यात आहे, असे आव्हान मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट द्वारे आदित्य ठाकरे यांना दिलं आहे. (Latest Marathi News)

नाशिक दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी भाजप शिंदे गटासह मनसेवर देखील अप्रत्यक्ष टीका केली होती. आदित्य ठाकरे यांनी अगोदर ब्ल्यू प्रिंट आली, ती कुठे गेली समजली नाही. नंतर नाशिक शहराला कोणीतरी दत्तक घेतले. त्या योजनेचे काय झाले, अशी खोचक टीका मनसेवर केली होती. या टीकेला मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिलंय . आमदार राजू पाटील (Raju Patil) ट्विट करत म्हणाले,'नाशिकमध्ये कोणताही वास्तु हडपण्यासाठी नव्हे,तर वंदनीय बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे स्मारक फक्त राजसाहेबांनी दिले, तुम्ही फक्त त्यांच्या नावाने भावनिक राजकारण केले. ज्यांनी तुमचा पक्ष व चिन्ह फोडला त्यांना नडा, आमची गणितं नंतर मांडा'.

'25 वर्षापासून आपली सत्ता असणाऱ्या आजोळची (डोंबिवली) दुर्दशा कधी पाहिली. कुठलेही काम न करता टक्केवारी करुन दाखवलं. बाता हाच गोठलेल्यांचा स्वभाव. त्यामुळे शिल्लकांनी नको तिथे बोट खूपसू नये. नाही तर बाळासाहेबांच्या विचारांसोबत नडला त्याला फोडला ही हिंमतही आमच्यात आहे, असं ट्विट करत आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

आदित्य ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील एका सभेत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. 'मी नाशिकमध्ये येत-जात असतो. मागील अनेक वर्षांपासून या शहरात येतो. माझ्या आजोबांसोबत,वडिलांसोबत मी आलेलो आहे. नाशिक माझं आवडतं शहर आहे. नाशिक आणि कोल्हापूर ही दोन्ही शहरे अद्याप हिरवीगार राहिले आहेत. ही शहरं चांगली प्रगत, शांत आणि हिरवीगार राहिलेली आहेत', असे आदित्य ठाकरे म्हणाले होते.

'मात्र, मला एक भीती वाटत आहे की, मागील १० वर्षांमध्ये नाशिक शहर प्रगतीच्या बाबतीत कुठेतरही हरवलेले होते. अगोदर ब्ल्यू प्रिंट आली, ती कुठे गेली समजली नाही. नंतर नाशिक शहराला कोणीतरी दत्तक घेतले. त्या योजनेचे काय झाले, अशी खोचक टीका आदित्य ठाकरेंनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकरांचा वीज अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT