jayant patil and tanaji sawant saam tv
महाराष्ट्र

MNS: 'मनसे विषयी मुस्लिम समाजात विष पेरण्याचे काम जयंत पाटलांनी थांबवावे'

मताच्या राजकारणासाठी सगळं सुरु आहे असेही तानाजी सावंत यांनी नमूद केले.

विजय पाटील

सांगली : सरकारने तीन मे पर्यंत मशिदीवरील भोंगे काढावेत अन्यथा सांगली (sangli) जिल्ह्यातील ज्या मशिदींवर भाेंगे (loudspekaer) असतील त्याच्या समाेर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (mns) हनुमान चालिसा (hanuman chalisa) लावणार असा इशारा मनसेनी आज येथे राज्य शासनास दिला. (maharashtra navnirman sena latest marathi news)

मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत माध्यमांशी बोलताना म्हणाले गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्याचा विषयी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. हा राजकीय विषय नूसन सामाजिक विषय असताना देखील राष्ट्रवादीने (ncp) वातावरण गढूळ केले आहे. आमचे तर म्हणणे आहे राष्ट्रवादी जातीयवादी आहे.

सांगलीत मनसेकडून इफ्तार पार्टीचे आयाेजन केले जाणार आहे. सांगली जिल्ह्यात सगळं व्यवस्थित सुरु असताना मंत्री जयंत पाटील हे मुस्लिम समाजात राज ठाकरेंविषयी विषय पेरण्याचे काम करीत आहेत. राज ठाकरे यांची भुमिका स्पष्ट आहे. तीन मे नंतरच ते पुढील दिशा ठरविणार आहेत. दरम्यान हा विषय केंद्राकडे ढकलला जात आहे. मताच्या राजकारणासाठी सगळं सुरु आहे असेही सावंत यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT