Eknath Shinde, Uddhav Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

Shivsena Bhavan : ठाकरे की शिंदे? शिवसेना भवन कुणाकडे राहणार? मनसे नेत्याचं सूचक ट्विट

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला चिमटा काढला आहे.

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बादवे

Sandeep Deshpande : पक्षनिधी तसेच शिवसेना भवनाचा ताबा उद्धव ठाकरेंकडे जाणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे. अशात 'शिवसेना भवन शिवाई ट्रस्टच की ???' असं ट्विट करत पुन्हा एकदा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला चिमटा काढला आहे. (Latest Politocal News)

संदीप देशपांडे यांच्या या ट्विटनंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अत्यंत महत्त्वाचा निकाल देत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले. त्यानंतर पक्षनिधीच्या मुद्द्यासह शिवसेना भवन यावरून वाद सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत.

धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मुख्यमंत्री शिंदेंना मिळालं. मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेले दादर येथील शिवसेना भवन अद्यापही उद्धव ठाकरेंकडेच आहे. शिवसेना भवन हे जरी शिवसेनेचे मुख्यालय असले तरी त्याची मालकी शिवसेना पक्षाकडे नाही तर ती उद्धव ठाकरेंकडेच आहे.

शिवसेना भवन हे सध्या शिवाई ट्रस्टच्या ताब्यात नसून उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे शिवसेना भवन हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच रहाणार आहे हे स्पष्ट होतं, त्यामुळेच शिवसेना भवनावर शिंदे गटाकडून दावा केले जाऊ शकत नाही, असं ठाकरे गटाचे पदाधिकारी सांगतात.

मात्र यावर संदीप देशपांडे यांनी शिवसेना भवन शिवाई ट्रस्टच की ? असा सवाल उपस्थित केल्यानं नाव आणि चिन्हा प्रमाणेच शिवसेना भवन देखील शिंदे गट स्वत:कडे घेणार का असा प्रश्नही निर्माण होत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर केल्यावर खासदार संजय राऊत मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेत. काल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठी आगपाखड केली. तसेच खालच्या शब्दांत टीका केली. त्यांच्या या टीकेवर देखील काल संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर देत राऊतांना मारले असते असं म्हटलं होतं. ही भाषा सहन केली जाऊ शकत नाही. मी तिथे हजर असतो तर मी त्यांना मारले असते. तुरुंगात गेल्यानंतर त्यांचे भान हरपले आहे, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नाशिकमध्ये मविआला खिंडार! अनेक बड्या नेत्यांनी सोडली साथ, भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ला यश

MPSC विद्यार्थिनीला लग्नाचं खोटं वचन; उद्योगपतीकडून वारंवार शारीरिक संबंध, बारामतीत नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: खोट्या मतदार यादीविरोधात शिवसेना ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

सलमान खानच्या 'Bigg Boss 19'मध्ये दिसणार 'नागिन'ची पहिली झलक, 'ही' अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

Dharashiv News : बांधकाम व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला, टोळीकडून लोखंडी रॉडने मारहाण; धाराशिवमध्ये खळबळ, CCTV व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT