Raj Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

Raj Thackeray News: राज ठाकरे १८ जानेवारीला परळी न्यायालयात हजर राहणार; काय आहे प्रकरण?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बीडच्या परळी न्यायालयाने चिथावणीखोर वक्तव्याबद्दल अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

विनोद जिरे

Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बीडच्या परळी न्यायालयाने चिथावणीखोर वक्तव्याबद्दल अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. यासाठी 12 जानेवारीला परळी न्यायालयात राज ठाकरे हजेरी लावणार होते. मात्र उद्या 12 तारखेला राष्ट्रमाता जिजाऊंनी जयंती आहे, त्यामुळं न्यायालयात सदरील तारीख वाढवून घेतली असून येणाऱ्या 18 जानेवारीला ते न्यायालयात हजर राहणार आहेत, अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वकील अर्जुन सोळंके यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

2008 मध्ये राज ठाकरे यांना एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती. या अटके नंतर त्याचे पडसाद परळीत उमटले होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली. यात बसचे नुकसान झाले होते.

याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर आणि चिथावणी दिल्याबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी चार्शीट फाईल केल्यानंतर राज ठाकरे व मनसे कार्यकर्ते न्यायालयात तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध 6 जानेवारी 2022 रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी केले.

बीडच्या परळीतील परळी-गंगाखेड रोडवरील धर्मापुरी फाटा येथे एसटीवर दगडफेक प्रकरणी राज ठाकरेंसह (Raj Thackeray) मनसेच्या कार्यकर्त्यांवर परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध परळी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. राज ठाकरे व मनसे कार्यकर्ते न्यायालयात तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध 6 जानेवारी 2022 रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी करत 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत परळी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

या प्रकरणातील मनसेचे (MNS) तत्कालीन पदाधिकारी संजय अघाव, प्रल्हाद सुरवसे, अनीस बेग, शिवदास बिडगर, राम लटपटे या पाच जणांनी न्यायालयात हजर हाेऊन अजामीनपात्र वॉरंट रद्द केले. परंतु राज ठाकरे यांच्याविरुद्ध 13 एप्रिल रोजी दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT