MNS Chief Raj Thackeray Saam TV News
महाराष्ट्र

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी घोषणा; 5 जुलैला विजयी मेळावा

Raj Thackeray News: राज ठाकरे यांनी हिंदी सक्ती रद्द केल्यावर मराठी भाषेच्या हक्कावर तडजोड होऊ नये, अशी भूमिका घेतली. ५ जुलै रोजी मोर्चा होणार की नाही, या मुद्द्यावर त्यांनी अधिक भाष्य केलं आहे.

Bhagyashree Kamble

मराठी अस्मितेसाठी आणि हिंदी भाषा सक्तीविरोधात ठाकरे बंधू आक्रमक झाले. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. या मोर्चाचं नेतृत्व ठाकरे बंधू एकत्र करणार होते. मात्र, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केल्याचं जाहीर केलं. या निर्णयानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत ५ जुलैला विजयी मेळावा होणार असल्याचं सांगितलं.

जीआर रद्द झाल्यानंतर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली यात त्यांनी संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली, 'काल राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केले. किंवा जीआर रद्द करणं त्यांना भाग पडलं. यासाठी मी महाराष्ट्रातील जनतेचा अभिनंदन करतो. खरंतर गरज नसतानाही हा विषय उचलला. जीआर रद्द झाल्यानंतर हा विषय आता संपला. मराठी जनतेसह मी साहित्यिक, काही कलाकार आणि मराठी माध्यमांचे पत्रकार, संपादकांचे मी आभार मानतो', असं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, शासन निर्णयानंतर मोर्चा रद्द करण्यात आला. रद्द झालेल्या मोर्चाबाबतही राज ठाकरेंनी भाष्य केलंय, 'हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हापासून आम्ही या निर्णयाविरोधात आहोत. त्यावेळी अनेक नेत्यांनीही पाठिंबा दर्शवला. आम्ही मोर्चाची तारीख ५ जुलै जाहीर केल. जर हा मोर्चा निघाला असता तर, भुतो न भविष्यति असा मोर्चा निघाला असता', असं राज ठाकरे म्हणाले. हा मोर्चा पाहून ७०-७५ वर्षांच्या लोकांना संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता, त्यामुळे परत सरकार अशा भानगडीत पडणार नाही, अशी आशा मी बाळगतो, असंही राज ठाकरे म्हणाले.

५ तारखेला विजयी मेळावा होणार

राज ठाकरेंनी ५ जुलैला मोर्चा नसून मेळावा निघणार असल्याचं सांगितलं. 'फडणवीस सरकारने निर्णय घेतल्यानंतर संजय राऊतांनी मला फोन केला . पुढे काय करायचं, असं मला त्यांनी विचारलं. मी त्यांना मोर्चा रद्द करावा लागेल असं म्हटलं. मग विजयी मेळावा घ्यायला पाहिजे. ठिकाण वगैरे आता जाहीर करायला नको, माझ्या सहकाऱ्यांशी बोलेन. ५ जुलैला विजयी मेळावा होईल. या मेळाव्याला पक्षीय लेबल लावण्यात अर्थ नाही, हा खरंतर मराठी माणसाचा विजय आहे,' असं राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT