Ratnagiri News, MNS saam tv
महाराष्ट्र

Raj Thackeray यांच्या दाै-याचा इम्पॅक्ट, मनसैनिक आक्रमक; 6 वर्ष रखडलेला प्रश्न साेडविण्यासाठी रत्नागिरी प्रशासनास दिला 20 दिवसांचा अल्टीमेटम

Ratnagiri Bus Stand News : मनसेच्या माेर्चात शेकडाे कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.

अमोल कलये

Ratnagiri News : रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचं काम गेल्या सहा वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत आहे. परिणामी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रखडलेल्या कामा विरोधात आता मनसे आक्रमक झाली आहे. आज शहर बस स्थानकात मनसेनं मोर्चा काढला. (Maharashtra News)

रत्नागिरीकर जनतेच्या असंतोषाचे कारण असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या रखडलेल्या नूतनीकरणाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आक्रमक झाला. बस स्थानकात (msrtc) गुराचं प्रतिकात्मक पुतळे दाखवून निषेध व्यक्त केला.

एसटीच्या अधिका-यांना मनसेकडून निवेदन देण्यात आले. पुढील वीस दिवसात दखल घेतली नाही तर गुरे बस स्थानकात बांधून गुरांचा गोठा असल्याचं जाहीर केलं जाईल असा इशारा मनसेकडून देण्यात आला.

या मोर्चाला (ratnagiri) मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर (vaibhav khedekar), मनसे प्रवक्ते योगेश चिले, जिल्हा संपर्क अध्यक्ष मनिष पाथरे, जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी आदी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

SCROLL FOR NEXT