Udyanraje-Shivendraraje Saam TV
महाराष्ट्र

Satara News : उदयनराजेंना सल्ला द्यायला ते साताऱ्यात असतात कधी? पेपरबाजी करायची अन् गायब व्हायचं; शिवेंद्रराजेंची जोरदार टोलेबाजी

निवडणुका लागल्यावर यायचं, मात्र पाच वर्ष कामाच्या नावानं बोंबाबोंब असते.

साम टिव्ही ब्युरो

>> ओंकार कदम

सातारा: साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (shivendraraje bhosale) यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाहीय. शिवेंद्रराजे भोसले यांनी पुन्हा एकदा खासदार उदयनराजेंवर टीका केली आहे. उदयनराजेंना फुकटचे सल्ले द्यायला ते कधी साताऱ्यात असतात का? असा टोला शिवेंद्रराजेंनी लगावला आहे.

उदयनराजेंना सल्ला द्यायला ते साताऱ्यात कधी असतात. महिन्यातून एकदा साताऱ्यात यायचं पेपरबाजी करायची आणि गायब व्हायचं. निवडणुका लागल्यावर यायचं, मात्र पाच वर्ष कामाच्या नावानं बोंबाबोंब असते. त्यांचा नगरपालिकेच्या कामावर कुठेही कंट्रोल नाही, नगरपालिकेतून बिल काढायची आणि कमिशन खायची, अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंवर केली आहे.

काही दिवसांपूर्वी उदयनराजेंनी टीका करताना म्हटलं होतं की, जनतेने मनापासून विशेष म्हणजे कायमस्वरुपी पालिकेतून रिटायर्ड केले आहे त्यांनी सातारा विकास आघाडीने आता रिटायर्डमेंट घ्यावी असा सल्ला देणे म्हणजे चोंबडेपणा आहे. आमदारांनी आता रियल इस्टेटचा व्यवसाय मंदावला असल्यास चोंबडे सल्ले देण्याचा नवीन व्यवसाय सुरु करावा.

कुरतडलेली दाढी आणि भुरकट मिशांना पीळ देण्यापेक्षा प्रेमाने कोणाला आलिंगन देणे केव्हाही चांगले. त्यांच्यासारखे निदान आमच्या पोटात एक आणि ओठात एक असे तरी नाही अशी टीका उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंच्या टिकेवर केला होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात उष्णतेचा कहर, विदर्भात तापमान ४५ पेक्षा जास्त

IPL 2026 मधील सर्वात जबरदस्त सामना; अवघ्या ३९ चेंडूंत RCBने मिळवला विजय,पॉईंट्स टेबल बेंगरुळुची भरारी

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

SCROLL FOR NEXT