mla shahajibapu patil saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी ! मुंबईतील आमदार निवासात छत कोसळला, सुदैवाने शहाजीबापू पाटील बचावले

आमदार शहाजीबापू पाटील यांची पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) गुवाहाटीतील झाडी, डोंगर आणि हॉटेलमुळं प्रकाशझोतात आले होते. त्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्या या डायलॉगबाजीवर मिश्लिक टीप्पणी करण्यात आली. एव्हढेच नव्हे तर काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल यावर गाणीही आली. परंतु, आता पुन्हा एकदा आमदार पाटील यांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचं कारण असं की, मुंबईत (Mumbai) असलेल्या आकाशवाणी (Mumbai Amdar Niwas) आमदार निवासातील पाटील यांच्या (teres collapsed) छताचा काही भाग कोसळला. त्यावेळी शहाजीबापू त्यांच्या रुममध्ये होते. पण, सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहाजीबापू यांची मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात खोली आहे. बुधवारी रात्री या खोलीतील छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. त्यावेळी शहाजीबापू हे त्याच खोलीत होते. पण, त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याने सुदैवाने या दुर्घटनेतून ते बचावले आहेत. दरम्यान, या घटनेबाबत शहाजीबापू यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीय. परंतु, या घटनेचे काही फोटो समोर आल्याने पाटील या दुर्घटनेत थोडक्यात बचावले असल्याचे समजते.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांना रेड्याची उपमा देऊन खरमरीत टीका केली होती. परंत, आमदार पाटील यांनी नुकतंच एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राऊत यांच्यावर पलटवार केला. मी माजलेला रेडा आहे, माझ्या नादाला लागू नका, असं म्हणत पाटील यांनी राऊतांवर घणाघात केला.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT