औंध रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक ACB च्या जाळ्यात, तीन जणांना घेतले ताब्यात

पुणे येथील औंध रुग्णालय प्रशासनाचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे.
Bribe crime
Bribe crimeSaam tv
Published On

पुणे : येथील औंध रुग्णालय (Aundh Hospital) प्रशासनाचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे. औंध रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सकासह तीन जणांवर लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) धडक कारवाई केली आहे. या रुग्णालयातील सहाय्यक अधिक्षक संजय कडाळे यांनी डॉ. माधव कणकवळे व महादेव गिरी यांच्यासाठी तक्रारदाराकडे ४० हजारांची लाच मागितली होती. या प्रकरणाची एसीबीनं तातडीनं दखल घेवून संबंधित अधिकाऱ्यावंर गुन्हा दाखल (Police fir filed) केला आहे. प्रशासकीय अधिकारी महादेव बाजीराव गिरी (52), जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. माधव बापूराव कनकवळे (50), सहाय्यक अधिक्षक (लिपीक संवर्ग) संजय सिताराम कडाळे (45) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत.

Bribe crime
एकनाथ शिंदे सरकारला मनसेच्या वसंत मोरेंनी दिलं आव्हान, म्हणाले हिम्मत असेल तर...

मिळालेल्या माहितीनुसार, सोनोग्राफी सेंटरचे प्रमाणपत्र परवान्याचे नुतनीकरण करुन देण्यासाठी 12 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी औंध रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकीत्सकांसह तीन जणांवर एसीबीने कारवाई केली आहे. तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली. औंध रुग्णालय येथे "एसीबी'च्या पथकाने तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. रुग्णालयातील अधिकाऱ्यां विरोधात एका व्यक्तीनं तक्रार दाखल केली होती.तक्रारदार व्यक्तीचे शिक्रापुर येथे सोनोग्राफी केंद्र आहे. संबंधित केंद्राचा परवाना प्रमाणपत्र नुतनीकरण करायचे होते.

त्यासाठी तक्रारदार व्यक्तीनं त्याबाबतची कागदपत्रे संबंधित रुग्णालयाकडे दिली होती. त्यावेळी रुग्णालयाचा सहाय्यक अधिक्षक संजय कडाळे यांनी डॉ.माधव कणकवळे व महादेव गिरी यांच्यासाठी तक्रारदाराकडे 40 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यांच्यात तडजोडीअंती 12 हजार रुपये देण्याचे निश्‍चित झाले होते.दरम्यान, तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर संबंधीत विभागाने या प्रकरणाची दखल घेऊन पडताळणी केली.त्यानंतर या प्रकरणात लाच मागितल्याची माहिती समोर आली.

Bribe crime
Eknath Shinde : केंद्राच्या पहिल्याच बैठकीत भुमीपुत्रानं घेतला साताऱ्यासाठी महत्वपुर्ण निर्णय

त्यानंतर गुरुवारी औंध रुग्णालय येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी कडाळे,डॉ.कणकवळे व गिरी यांनी संगनमत करुन कडाळे यांच्या मदतीनं तक्रारदाराकडून 12 हजार रुपयांची लाच घेतली. त्याच दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अतिरीक्त पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाळी पोलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर, पोलिस उपअधिक्षक सीमा अडनाईक, पोलिस कर्मचारी नवनाथ वाळके, अंकुश माने,पांडुरंग माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Edited By - Naresh shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com