Shahaji Bapu Patil Saam Tv
महाराष्ट्र

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत मिळेल, आमदार शहाजी बापू पाटलांचं आश्वासन

आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज सांगोला तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांची पाहणी केली.

साम टिव्ही ब्युरो

पंढरपूर : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक बडे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी करत आहेत. मात्र शेतकऱ्यांचा लक्ष सरकारकडून मिळणाऱ्या मदतीकडे लागलं आहे. पंचनामे काही ठिकाणी अद्याप सुरुही झाले नाहीत मात्र नेते मंडळी मोठ्या मदतीचे आश्वासन देत आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटलांनी (Shahaji Bapu Patil) देखील केंद्र सरकारच्या निकषांपेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांनी दिली जाईल, असं आश्वासन दिलं आहे.

आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज सांगोला तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांची पाहणी केली. नुकसान झालेल्या पिकांना केंद्र सरकारच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत केली जाईल असे आश्वासन शहाजी बापू पाटील यांनी आज दिले. मागील आठ दिवसापूर्वी सांगोला तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये संगेवाडी, मांजरी परिसरातील मका, डाळिंब, सूर्यफुल या पिकांचे अधिक नुकसान झाले आहे.(Maharashtra News)

या नुकसानाची पाहाणी आज शहाजी बापू पाटील यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत शासकीय अधिकारी देखील होते. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेशही दिले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे 10 गुंठे क्षेत्रसुद्धा मदतीपासून वंचित राहणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT