Mla Shah Faruk Anwar saam tv
महाराष्ट्र

Dhule News : जिवाचे काही बरे वाईट झाल्यास नाशिक पोलीस महानिरीक्षक जबाबदार : आमदार फारुक शहा

भूषण अहिरे

Dhule News : भाजप धुळे शहराचे वातावरण दूषित करीत आहे. जातीय दंगल भडकवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा आरोप आमदार फारुक शहा (Shah Faruk Anwar) यांनी भारतीय जनता पक्षावर केला आहे. दरम्यान आपल्या जिवाचे काही बरे वाईट झाल्यास नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक जबाबदार राहतील असेही फारुक यांनी नमूद केले. (Maharashtra News)

धुळे शहराचे आमदार फारुक शहा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप आमदार नितेश राणे यांच्यासह भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे.

त्यानंतर हे सर्व नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बि. जे. शेखर- पाटील यांच्यावर त्यांनी नाशिक ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील प्रकरणावरून केलेल्या आरोपांमुळे आपल्याला अडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याची फारुक शहा यांनी भावना व्यक्त केली आहे.

नाशिक ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित पाटील यांच्याशी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी. जे. शेखर-पाटील यांचे थेट संबंध असल्याने बी. जे. शेखर-पाटील यांना देखील सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी आमदार फारुक शहा यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर त्यांच्यावर टिपू सुलतान स्मारक प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप तर्फे केल्यानंतर आमदार फारुक शहा यांनी आपल्याला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

Skin Care : त्वचेवर दिवसातील कोणत्या वेळेस कोरफडीचे जेल लावावे? जाणून घ्या फायदे

Vidhan Bhavan Threat Mail: मुंबईत ४ ठिकाणी बॉम्बने उडवण्याची धमकी; पाहा ईमेलमध्ये नेमकं काय?

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT