Sanjay Raut News Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Shirsat : पहाटेचा शपथविधी घडवून आणण्यात राऊतांचा मोठा वाटा; शिंदे गटातील आमदाराचा गौप्यस्फोट

पहाटेच्या शपथविधीची माहिती शरद पवारांप्रमाणे संजय राऊत (Sanjay Raut) यांना देखील होती असे वक्तव्य शिरसाट यांनी केले आहे.

डॉ. माधव सावरगावे

Sanjay Shirsat On Sanjay Raut : मागील काही दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. पहाटेच्या शपथविधीविषयी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील माहिती होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.  (Latest Marathi News)

फडणवीसांच्या या वक्तव्याची राज्यातील राजकारणात बरीच चर्चा झाली होती. यानंतर शरद पवारांनी फडणवीसांना आपल्या खास शैलीत उत्तर देखील दिलं होतं. दरम्यान, आता शिंदे गटाचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

पहाटेच्या शपथविधीची माहिती शरद पवारांप्रमाणे  संजय राऊत (Sanjay Raut) यांना देखील होती असे वक्तव्य शिरसाट यांनी केले आहे. 'साम टीव्ही'शी बोलताना संजय शिरसाट यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत पडद्यामागून काम करत होते. त्यांना हे प्रकरण माहित होते, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.  (Maharashtra Political News)

काय म्हणाले संजय सिरसाट?

पहाटेच्या शपथविधीची माहिती शरद पवारांप्रमाणे संजय राऊतांना देखील होती. पडद्यामागून काम करत होते. त्यांना हे प्रकरण माहित होते. शपथविधी घडवून आणण्यामागे संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे, असा गौप्यस्फोट  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे संजय सिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखीच तापण्याची शक्यता आहे.

'संजय राऊत सायको आहेत'

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांची जी अडचण वाढली आहे, ती फक्त या सायको भुमिकेने झाली आहे. संजय राऊत वक्तव्य करतात आणि ते निस्ताराचे काम उद्धव ठाकरे यांना करावे लागत होते.संजय राऊत सायको आहेत, ते कधी काय बोलतील आणि कोणाला अडचणीत आणतील हे सांगताच येत नाही, असं देखील संजय शिरसाट म्हणाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Gilki Recipe: गिलक्याची भाजी आवडत नाही? मग एकदा ट्राय करा झणझणीत भरली गिलकी, शुन्य मिनिटांत जेवण होईल फस्त

Balushahi Recipe: झटपट घरीच बनवा खुसखुशीत आणि रसाळ बालूशाही, वाचा सोपी रेसिपी

Pune Crime: पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार; कोरेगाव पार्क परिसरातील मध्यरात्रीच्या थराराने खळबळ

मोठी बातमी! राज्यमंत्र्याचे निधन, भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर; राजकीय वर्तुळात शोककळा

Breast cancer: शरीरात ही 8 लक्षणं दिसली तर समजा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो

SCROLL FOR NEXT