योगी- महाराज राजकारणात आल्यानेच देशाचे वाटोळे झाले- आ. प्रणिती शिंदे Saam Tv
महाराष्ट्र

योगी- महाराज राजकारणात आल्यानेच देशाचे वाटोळे झाले- आ. प्रणिती शिंदे

विश्वभुषण लिमये

सोलापूर: आगामी महापालिका (Municipal Corporation), जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये (election) निश्‍चितपणे कॉंग्रेसला मोठे यश येणार आहे. महापालिकेवर कॉंग्रेसचाच (Congress) झेंडा फडकणार आहे. सर्वसामान्य जनता हीच कॉंग्रेसची ताकद आहे. कॉंग्रेसच्या काळामध्ये गॅस सिलिंडरची (Gas cylinder) किंमत ३५० रुपये होती, पण आता १ हजारांवर तो येऊन पोहचला आहे. नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) मते मागत आहेत. योगी आणि महाराजांची जागा मंदिर, मठात असून राजकारणामध्ये (politics) नाही. ते राजकारणामध्ये आल्यानेच देशाचे वाटोळे होत असल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी यावेळी केली आहे. (mla praniti shinde said yogi and maharaj country turmoil only after entering politics)

हे देखील पहा-

जाती- धर्मात भांडण लावून निवडणुका जिंकले जात आहेत. तरीदेखील, दोनवेळा लोकसभेला पराभव झाला म्हणून खचून न जाताना परत एकदा जोमाने लढायला पाहिजे. शहर कॉंग्रेसच्या विजयी संकल्प मेळाव्यामध्ये, माजी गटनेते सांगितले की, आगामी महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसकडून त्रास दिला जात आहे. यामुळे 'आई जेवू देईना अन्‌ बाप भीक मागू देईना' अशी आमची अवस्था झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांकडून कॉंग्रेस नगरसेवकांना निधी दिला जात नसल्याची तक्रार माजी नगरसेवक (Corporator) बाबा मिस्त्री यांनी प्रदेशाध्यक्षांकडे केली होती.

हेरिटेज येथील कॉंग्रेसच्या विजयी संकल्प मेळाव्याप्रसंगी कॉंग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांना बोलण्याची संधी देण्यात आली होती. त्यावेळी सर्वप्रथम चेतन नरोटे हे म्हणाले की, दररोज पाणी देतो म्हणून सत्तेवर बसलेल्या भाजपच्या काळामध्ये ६ दिवसआड पाणी मिळत आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या काळामध्ये मंजूर झालेल्या कामांचे श्रेय्य भाजपचे नेतेमंडळी घेत आहेत. त्यानंतर बाबा मिस्त्री म्हणाले की, कॉंग्रेस हा खूप मोठा पक्ष असून कोणी गेल्याने तो लवकर संपणार नाही. पण, आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्री करण्याची गरज आहे.

जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते- पाटील देखील म्हणाले की, वीजेचा प्रश्‍न सध्या गंभीर असून शेतकऱ्यांना वीज माफी मिळायला हवी. माजी मंत्री म्हेत्रे म्हणाले की, एकमेकांना खाली खेचण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी सोलापूर शहर- जिल्ह्यासाठी खूप काही काम केले आहे. त्यांच्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपदाची संधी द्यावी. राज्यात सर्व महामंडळात अध्यक्षांच्या निवडी तातडीने करून महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT