Nitesh Rane, Grampanchayat Election Result 2022,  saam tv
महाराष्ट्र

Nitesh Rane : 'महाराष्ट्रातील पनवती संपली आता सकारात्मक वातावरण आहे' राणेंचे 'मविआ' वर शरसंधान

राज्यातील विविध जिल्ह्यात रविवार ग्रामपंचायत निवडणुक झाली. त्याचे निकाल आज सकाळपासून जाहीर हाेऊ लागले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

Nitesh Rane : राज्यातील जनतेचा विश्वास भाजप (bjp) आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावर वाढत चाललेला आहे. अडीच वर्षापुर्वी राज्यात नकारात्मक वातावरणं हाेते. त्यात बदल झाला आहे. आता सकारात्मक वातावरण झाल्याचं आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी नमूद केले. रविवारी झालेल्या ग्रामपंचयातीच्या (grampanchayat) निवडणुकीच्या निकालावर आमदार राणे बाेलत हाेते. (Breaking Marathi News)

सिंधुदुर्गात भाजपचे वर्चस्व

सिंधुदुर्गातील एकूण चार ग्रामपंचायत निवडणुकीपैकी तीन निकाल हाती आले आहेत. त्यातील दोन ग्रामपंचायतवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. एका ग्रामपंचायत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे आहे. यात दोडामार्ग तालुक्यातील पाटये पुनर्वसन ग्रामपंचायत व देवगड तालुक्यातील मळेगाव ग्रामपंचायत भाजपकडे तर देवगड तालुक्यातील पडवणे ग्रामपंचायत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे आली आहे.

शिंदे फडणवीस सरकारवर लाेकांचा विश्वास

या निकालावर आमदार नितेश राणे म्हणाले सिंधुदुर्गात चार पैकी तीन ग्रामपंचायतवर भाजपकडे आले आहेेत. लोकांचा विश्वास भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आहे, त्यामुळे राज्यात सकारात्मक वातावरण आहे. गेल्या तीन महिन्यात शिंदे फडणवीस सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयामुळे या सरकारवर लोकांचा विश्वास वाढत चालला आहे असेही आमदार नितेश राणे यांनी नमूद केले. (Nitesh Rane Latest Marathi News)

आमदार राणे म्हणाले गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात पनवती लागली होती. त्यामुळे नकारात्मक वातावरण होतं. ते बाजूला सारून सकारात्मक वातावरण या निवडणुकीत तयार झालं आहे असेही राणे यांनी नमूद केले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT