Bachchu Kadu On Cabinet Expansion
Bachchu Kadu On Cabinet Expansion saam tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu On Cabinet Expansion: कारल्याला काही कारले येईना... मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडूंची मिश्किल टिप्पणी

साम टिव्ही ब्युरो

Bachchu Kadu Latest News : गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या चर्चा सुरू आहेत. अनेकदा मंत्रिमंडळ विस्तार होणार असे वृत्त माध्यमांत देखील झळकले. मात्र अद्याप तरी मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडलेला नाही. दोन्ही सत्ताधारी पक्षातील अनेक नेते मंत्रिपदाची स्वप्न पाहात आहेत. अशात आमदार बच्चू कडू यांना याविषयी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी त्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे.

बच्चू कडू म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. तो जेव्हा व्हायचा तेव्हा होईल परंतु राज्यात विकासकामे वेगाने सुरू आहेत. माझ्या मतदारसंघात देखील मी गेल्या 15 वर्षात जेवढी कामं केली नाही, तेवढी काम या काळात केली आहे. त्यामुळे विस्तार जेव्हा व्हायचा तेव्हा होईल.

पुढे बोलताना त्यांनी एका लोगगीताच्या ओळी वापरून मंत्रिमंडळ विस्तारावर मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे कारल्याले कारले येऊ दे ग सूनबाई, मग जाय आपल्या माहेरा या कवितेसारखा आहे. कारल्याला काही कारल येत नाही आणि सुनबाई काही माहेरी जात नाही अशीच एकंदरीत परिस्थिती आहे असे बच्चू कडू म्हणाले. (Latest Political News)

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या खात्यात पैशांच्या बदल्यात बादल्या करण्यात आल्या असा आरोप भाजपच्या 4 आमदारांनी केला आहे. मुनगंटीवार हे विदेश दौऱ्यावर असताना वनविभागात 200 हून अधिक बदल्या झाल्या आणि या सर्व बदल्या पैसे घेऊन करण्यात आल्या असा आरोप चार आमदारांनी केला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, बदलीसाठी कोण पैसे घेतले यावर निर्बंध आणले पाहिजे. काही अधिकारी एकाच ठिकाणी बसले आहेत त्या अधिकाऱ्याना गावपातळीवर आणले पाहिजे. आरोप हे कशाच्या आधारे केले हे ही तपासून पाहिले पाहिजे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलिस करणार बंद

Sanjay Raut News: एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा विरोध होता; संजय राऊतांचा खळबळजनक दावा!

Fruits In Summer: उन्हाळ्यात खा ही ५ फळे, शरीराला मिळेल थंडावा

Pune News: भयंकर! पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवलं, तरुण-तरुणी हवेत उडाले; जागेवरच मृत्यू

Solapur Crime News: दुहेरी हत्याकांडाने माळशिरस हादरले; दिवसाढवळ्या चाकूने भोसकून दोघांची हत्या

SCROLL FOR NEXT