Mla Baban Shinde, Ujani Dam, Pandharpur News saam tv
महाराष्ट्र

Mla Baban Shinde News : शेतक-यांचे दोन हजार कोटी रूपयांचे नुकसान हाेणार, आमदार बबन शिंदेंना भीती

Pandharpur News : साेलापूरात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

भारत नागणे

Ujani Dam News : येत्या काही दिवसात उजनी धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडले नाही तर सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांचे सुमारे दोन हजार कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. प्रसंगी सोलापूर शहरासाठी टॅंकरने पाणी पुरवठा करा पण उजनीच्या उजवा आणि डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे अशी मागणी आमदार बबन शिंदे (mla baban shinde) यांनी केली आहे. (Maharashtra News)

सध्या उजनी धरणात उपयुक्त 13 टक्के पाणीसाठा (ujani dam water level) शिल्लक आहे. शेतीसाठी आणि जनावरांसाठी धरणातून कालव्याद्वारे दहा टीएमसी सोडले तरी 50 टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे.

सध्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने ऊस पिक जळू लागले आहे. धरणातून पाणी सोडले नाही तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

सोलापूर शहराला टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठी दोनशे ते अडीचशे कोटी रुपये लागतील तुलनेने शेतक-यांचे होणारे नुकसान मोठे आहे. कालवा समितीच्या बैठकीत पाणी सोडण्यावर सकारात्मक चर्चा होईल असा आशावाद आमदार शिंदे व्यक्त केला. दरम्यान पुणे जिल्ह्यातील धरणातून सध्या तरी उजनीत पाणी सोडण्याची गरज नसल्याचेही आमदार बबन शिंदे यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT