Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

...तर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर लोकशाहीसाठी घातक - एकनाथ शिंदे

'असं घडंल असेल तर हा दुर्देवी प्रकार आहे. यापुर्वी देखील मी सांगितलं आहे, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई ठीक आहे.'

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अलिबाग आणि दादर येथील संपत्तीवर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईबाबत बोलताना शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही कारवाई दुर्दैवी असल्याचं म्हंटल आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'असं घडंल असेल तर हा दुर्देवी प्रकार आहे. यापुर्वी देखील मी सांगितलं आहे, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई ठीक आहे.

मात्र, राजकीय सूड भावनेन आणि आकसापोटी कारवाई करण्यात आली असेल तर या केंद्रीय यंत्रणाचा वापर लोकशाहीसाठी घातक आहे असही शिंदे यांनी म्हंटलं आहे. तसंच संजय राऊत यांनी 'असत्यमेव जयते' म्हटंल आहे याबाबत पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले असतील तर ठिक आहे ना असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

हे देखील पहा -

या कारवाईमुळे राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी ही कारवाई केल्याचं वक्तव्य सरकारमधील नेते करत आहेत तसंच ही कारवाई सुडबुद्धीने केली असल्याचंही गृहराज्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे.

कोणती संपत्ती केली जप्त -

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प प्रकरणात ED ने PMLA अंतर्गत संजय राऊतांची 11 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. यामध्ये प्रवीण राऊत यांच्या पालघर येथील जमिनीसह वर्षा राऊत यांचा दादर येथील फ्लॅट, वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या अलिबाग येथील भूखंडांचा समावेश आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Fort : नावच सांगतंय इतिहास! शिवरायांनी घेतलेल्या विश्रांतीमुळे प्रसिद्ध झाला किल्ला

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

SCROLL FOR NEXT