नागपूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आजपासून चार दिवस विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत सोबतच यावेळी ते कार्यकर्त्यांच्या भेटींसह काही ठिकाणी सभाही घेणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवारांचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय. (Mission Vidarbha: Sharad Pawar on a four day tour of Vidarbha from today)
हे देखील पहा -
विशेष म्हणजे भाजपच्या गडात राष्ट्रवादीचं 'मिशन विदर्भ' सुरु झाल्याने भाजपही सावध झाले आहे. आज दुपारी एक वाजता नागपूरात शरद पवारांचं आगमन होईल. त्यानंतर ते व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतील, त्यानंतर पत्रकार परिषद घेतील आणि शेवटी कार्यकर्ता मेळावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सुचना करतील. पवार यांच्या दौऱ्यामुळं विदर्भातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून यामुळे पक्षाला बळ मिळणार आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.