Mira Road Killing Case Saam TV
महाराष्ट्र

Mira Road Killing Case: हत्या, मग शरीराचे तुकडे पाण्यात उकळले; मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सानेनं केलं ऑनलाईन सर्च

Mira Road Police: पोलिसांनी मनोजला ताब्यात घेतलं असून या त्याची चौकशी सुरु आहे.

Ruchika Jadhav

Mira Road News: मीरा रोड परिसरात लिव्ह इन रिलेशनशिप पार्टनच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मनोज साने (वय ५६ वर्षे) यावर आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी मनोजला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. या चौकशीत सानेविषयी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. (Political News)

मनोज साने आणि ३२ वर्षीय तरुणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र दोघांच्या वयातील अंतर जास्त असल्याने त्यांनी आपलं नातं लपवलं होतं. सानेच्या चौकशी दरम्यान पोलिसांनी त्याच्या घरातील काही वस्तू जप्त केल्या आहेत. यामध्ये त्याचा फोन देखील जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सानेचा फोन पूर्ण चाळला आहे. त्यामध्ये मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी यासाठी त्याने शोध घेतल्याचं सर्चहिस्ट्रीमध्ये दिसत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी तरुणीची हत्या करण्यात आली. त्यानंतर दोन दिवस साने तिच्यासह त्या खोलीत होता. हत्येनंतर आरोपीने सरस्वतीच्या मृतदेहाचे इलेक्ट्रिक ट्री कटरच्या सहाय्याने बारीक बारीक तुकडे केले होते. त्यानंतर आरोपीने हे तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवले आणि कुत्र्यांना खायला घातले. तर काही तुकडे त्याने मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक केले होते.

पोलिसांनी त्याचा फोन चेक केल्यावर त्यामध्ये त्याने या सर्वगोष्टी सर्च केल्याचं दिसत आहे. साने सतत अश्लिल व्हिडिओ पाहत होता. त्या साईडची नावे त्याच्या लक्षात राहत नसल्याने एका नोटपॅडवरही लिहून ठेवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rutuja Bagwe : ऋतुजा बागवेची नवी इनिंग! सुरू केलं स्वत:चं रेस्टॉरंट, लोकेशन काय?

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Smartphone Care: पावसात फोन भिजला? घाबरू नका, 'या' टिप्सने तुम्ही फोन पुन्हा चालू करू शकता

Ladki Bahin Yojana: लाडकीसाठी सर्वात मोठी बातमी! राज्यातील तब्बल ५० लाख महिलांचा लाभ कायमचा बंद, कारणही आले समोर

Bhimashankar : पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त भिमाशंकरमध्ये शिवलिंगावर दुग्धाभिषेक आणि महाआरती | VIDEO

SCROLL FOR NEXT