Mira Bhayander News Saam tv
महाराष्ट्र

Mira Bhayander News : वरसावे खाडीत दाम्पत्याची उडी; पतीला वाचवण्यात यश, महिलेचा शोध सुरू

Mira Bhayander News : जोडपे हे नायगावमधील राहणारे असून घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे

Rajesh Sonwane

महेंद्र वानखेडे 
मिरा भाईंदर
: अहमदाबादवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ब्रिजवरून गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास वरसावे खाडीत एका जोडप्याने उडी मारल्याची माहिती समोर आली आहे. हि घटना माहिती झाल्यानंतर यातील पुरुषाला बाहेर काढण्यात अग्निशमक विभागाला यश आले आहे. तर सदर महिलेचा शोध सुरू आहे.


नायगाव आणि भाईंदरच्या मध्यभागी असलेल्या वरसावे खाडी पूल असून सकाळी दहाच्या सुमारास शशिकला दिनेश यादव (वय २८) आणि दिनेश यादव (वय ३२) हे दोघे नायगावहून ब्रिज वरती पोहोचले. यानंतर शशिकला या महिलेने वरसावे खाडीमध्ये उडी मारली. पत्नीने उडी मारल्याचे पाहून तिला वाचवण्यासाठी तिचा पती दिनेश यादव यांनी देखील उडी मारली. हा सर्व प्रकार महामार्गावरून येणाऱ्या वाहन चालकांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी मिरा- भाईंदर अग्निशामक दल, काशिगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहोचले. 

घटनास्थळी दाखल झालेल्या पथकांनी खाडीत शोध मोहिमेला सुरवात केली. यात स्पीड बोटच्या साह्याने दिनेश यादव याला वाचवण्यात यश आले आहे. मात्र महिलेला पोहता येत नसल्याने पाण्याच्या प्रवाहामध्ये खाली बुडाली. अग्निशामक दल व स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून संबंधित महिलेचा शोध सुरू असल्याची माहिती काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार सदरचे जोडपे हे नायगावमधील राहणारे असून घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचा तपास काशिगाव पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT