Beed crime update saam tv
महाराष्ट्र

Beed News: आधी लग्नाचं आमिष, नंतर अश्लील फोटोंची धमकी, बीडमध्ये विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार

Minor Schoolgirl Assaulted in Beed: पुण्यानंतर आता बीडमध्ये एका अल्पवयीन शाळकरी मुलीबरोबर अतिप्रसंग घडला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

बीड : राज्यात महिला सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पुण्यातील स्वारगेट बस डेपोतील बलात्कार प्रकणानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. पुण्यानंतर आता बीडमध्ये एका अल्पवयीन शाळकरी मुलीबरोबर अतिप्रसंग घडला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

बीड जिल्ह्याच्या परळी येथील संभाजी नगर पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन शाळकरी मुली लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला आहे. मुलीला लग्नाचे आमिष दाखवत नराधमाने तिच्यावर बलात्कार केला आहे. धीरज रामकिशन कांदे असे आरोपीचे नाव असून, तो परळी येथील शिवाजीनगरचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपीनं आधी मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याबरोबर आपत्तीजनक फोटो काढले. मुलीसोबत फोटो काढल्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. फोटोचा वापर करत तो नराधम तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. या प्रकणाची माहिती पीडित मुलीनं आपल्या कुटुंबाला दिल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

संतापलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबाने आरोपी विरोधात परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ear health awareness: सततचा गोंगाट ठरतोय धोकादायक! शहरातील आवाजामुळे कमी होतेय ऐकण्याची क्षमता

Maharashtra Live News Update : पालीच्या बल्लाळेश्वर देवस्थानावर महाप्रसाद बंद करण्याची वेळ

बाईक रात्रभर सुरू ठेवली, घरात विष तयार झाले, ४ जणांचा गुदमरून मृत्यू, धक्कादायक घटनेनं राज्य हादरलं

Blood Pressure Control: BP नियंत्रणात ठेवायचाय? हार्ट अटॅकचा धोका कमी करायचाय? 'ही' ४ फळं खायला करा सुरू, डॉक्टरांनी दिली महत्त्वाचा सल्ला

Sunscreen Using Tips: सनस्क्रिन रोज लावयची की नाही? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT