gadchiroli Crime News Saam Tv
महाराष्ट्र

महाराष्ट्र हादरला! एकट्यात बसलेल्या मुलीवर वाकडी नजर; नराधमाकडून स्वतःच्या घरी नेऊन अत्याचार

gadchiroli crime : गडचिरोलीत खळबळजनक घटना घडली. नराधमाने स्वतःच्या घरी नेऊन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली.

Vishal Gangurde

गडचिरोलीत चिमुकलीवर अत्याचार

चिमुकलीवरील अत्याचाराने परिसरात खळबळ

आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

गणेश शिंगाडे, साम टीव्ही

गडचिरोलीत महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे. गडचिरोलीच्या कोटगुल पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीच्या कोरची तालुक्यातील कोटगुल पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. ५१ वर्षीय नराधमाने बालिकेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या नराधमाविरोधात कोटगुल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पीडित मुलगी एकटी असल्याची नराधमाने संधी साधली. या नराधमाने स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पीडित कुटुंबीयांनी पोलिसांत माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणी कोटगुल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उप निरीक्षक प्रतीक्षा राठोड करीत आहेत. नागरिकांकडून आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. या घटनेनंतर गडचिरोलीत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नागपुरात शिक्षिकेने विद्यार्थिनीला दिली अमानुष शिक्षा

नागपूरमधील एका नामांकित शाळेतील सातवीच्या विद्यार्थिनीला शिक्षिका आणि मुख्याध्यापिकेकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या धक्कादायक प्रकारानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवार बारामतीत अॅक्शन मोडवर

UPI Wrong Transfer: UPI वरून चुकीच्या खात्यात पैसे गेले? नियम काय सांगतो? वाचा...

Tea Types: तुम्हीही चहाप्रेमी आहात? मग चहाचे हे 5 प्रकार नक्की ट्राय करा

Government Aircraft : सरकारी हवाई वाहनांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचं स्मारक उभारण्यात येणार? आमदार महेश लांडगे यांचं महापालिका आयुक्तांना पत्र

SCROLL FOR NEXT