Shambhuraj Desai News, Nagpur News saam tv
महाराष्ट्र

Shambhuraj Desai: मी चौकशीला सामोरे जाण्यास तयार, पण...'; शंभूराज देसाईंचं विरोधकांच्या घोटाळ्यावरील आरोपांवर स्पष्टीकरण

घोटाळ्याच्या आरोपानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Shambhuraj Desai News : हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गायरान जमीन घोटाळ्यावरून आरोपांच्या फैरी झडत आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधकांडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संजय राठोडनंतर आता ठाकरेंच्या निशाण्यावर शंभूराज देसाई आहेत. ठाकरे गटाकडून विधानभवनाच्या पायरीवर मंत्री उदय सामंत, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री संजय राठोड आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. याचदरम्यान घोटाळ्याच्या आरोपानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Latest Marathi News)

मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आरोपावर स्पष्टीकरण देताना म्हणाले, 'आज मी सकाळपासून मी विधानसभा आणि परिषदेत व्यग्र होतो. अनिल परब यांनी माझ्यावर काही आरोप केले आहेत. मी कामकाजात व्यस्त होतो म्हणून बोलू शकलो नाही. नावली तालुका महाबळेश्वर येथे माझी शेतजमीन आहे'.

'२००३ साली मी शेतजमीन खरेदी केले आहे. जमीन आणि जमिनीत असणारे घर यासोबत मी खरेदी केली आहे. अनिल परब यांनी केलेला आरोप खोटा आहे, असे स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी दिलं आहे.(Nagpur News)

'शेतजमीन आणि घरासह असा उल्लेख मी माझ्या निवडणुकीच्या अर्जात भरला आहे. बेछूट आरोप अनिल परब करत आहेत. मी मंत्री म्हणून आज जाहीरपणे सांगतो, मी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे. पण मला अनिल परब यांना एवढंच सांगायचं आहे की, मी रीतसर जमीन खरेदी केली आहे', असेही शंभूराज देसाई म्हणाले.

तर यावेळी शंभुराज देसाई यांनी अनिल परब यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. 'ज्यांची स्वतःची बेकायदेशीर बांधकामे आहेत, त्यांनी आरोप करू नये. मी अनिल परब यांना एक संधी देईन. अनिल परब हे वकील आहेत त्यांनी सत्यता पडताळावे त्यांनी आरोप मागे नाही घेतले तर वकिलांशी बोलून त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा शंभूराज देसाई यांनी केला.

'मुख्यमंत्री, अब्दुल सत्तार,संजय राठोड आणि माझ्यावर आरोप केले पण पुरावा नाही. शिल्लक सेनेच्या आमदाराचा त्यांच्या नेत्यांना दाखवण्यासाठी आरोप होतोय. त्यांना आम्ही केलेल्या उठावाचा धक्का बसला म्हणून हे शिल्लक सेनेचे अनिल परब आरोप करत आहेत, असा हल्लाबोल शंभूराज देसाई यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Mall threat : पुण्यातील मॉल उडवून देण्याची धमकी, तो मेल कोणी केला?

Pune BJP : भाजपचा स्थापना दिवस अन् अनधिकृत फ्लेक्सची बजबजपुरी, पुणे महापालिका कारवाई करणार?

Kalyan Tourism : कल्ला मस्ती ऑन द वे! वीकेंडला फिरा 'कल्याण'जवळील 'हे' पिकनिक स्पॉट्स, प्लान करा Summer ट्रिप

राजकारणात बदलाचे संकेत! २८८ नव्हे तर असतील ३५० आमदार; ५४४ ऐवजी असणार ६५० खासदार,MP, MLAची संख्या वाढणार?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील भोंदू अशोक खरात यांच्या कार्यालयात पुन्हा एसआयटीच पथक दाखल

SCROLL FOR NEXT