Uddhav Thackeray- Aditya Thackeray Saam TV
महाराष्ट्र

आम्ही फक्त झेंडे लावायला पाहिजे होतो; एकनाथ शिंदेंचा धसका घेतला म्हणून घराबाहेर पडले, संदीपान भुमरेंची टीका

उद्धव ठाकरे कोरोना काळात कोणत्या जिल्ह्यात गेले, कोणती बैठक घेतली. घरी होते मातोश्रीमध्ये बसून राहिले. फक्त ऑनलाईन दिसायचे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास

वर्धा : शिवसेनेतील (Shivsena) आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मातोश्री विरुद्ध बोलणार नाही असं जाहीर म्हटलं होतं. मात्र आता मंत्रिपद मिळाल्यानंतर आमदार थेट बोलू लागले आहे. एकनाथ शिंदेचा धसका घेतला म्हणून आता घराबाहेर पडले असल्याची टीका मंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केली आहे. विधानपरिषद, राज्यसभा आणि पालकमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांना मुंबई आठवायची आणि शिवसैनिक फक्त झेंडे लावायला पाहिजे होते, अशी टीका संदीपान भुमरे यांनी केली.

शिंदे गटाकडून संपूर्ण महाराष्ट्रात 'हिंदू गर्व गर्जना यात्रा' काढण्यात आली आहे. या यात्रेदरम्यान आज संदीपान भुमरे हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोरोना काळात एकनाथ शिंदे आणि आम्ही काम केलं. उद्धव ठाकरे कोरोना काळात कोणत्या जिल्ह्यात गेले, कोणती बैठक घेतली. घरी होते मातोश्रीमध्ये बसून राहिले. फक्त ऑनलाईन दिसायचे. त्यावेळी आदित्य ठाकरे कुठे गेले नाही मग आता का फिरत आहेत. शरद पवार (Sharad Pawar) वयाच्या 85व्या वर्षी महाराष्ट्रात फिरत होते. आता आम्ही उठाव केल्यावर कसं सगळ्या ठिकाणी जात आहेत. अडीच वर्षात कोणी ठाकरे घरातील तुमच्या जिल्ह्यात आलं का असं म्हणत संदीपान भुमरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

माझ्यासारखा हाडाचा शिवसैनिक जेव्हापासून मला मतांचा अधिकार आहे तेव्हापासून मी शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केले. अडीच वर्षांपूर्वी जेव्हा पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली तेव्हा संभाजीनगरचा पालकमंत्री कोण तर मुंबईचे सुभाष देसाई. उद्धव ठाकरे यांना स्थानिक संदीपान भुमरे दिसला नाही. मी शिवसैनिक नव्हतो का असा सवालही त्यांनी केला. सोबतच विधानपरिषद, राज्यसभा आणि पालकमंत्री हवा असला की उद्धव ठाकरे यांना मुंबई दिसायची आणि स्थानिक शिवसैनिक फक्त झेंडे लावायला का? अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी काम करण्याचा प्रयत्न केला, अशी टीका संदीपान भुमरे यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. संदीपान भुमरे यांना औरंगाबादचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावर भुमरे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जबरदस्ती शारीरिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात; इरफाननं ओळख लपवून तरूणींना फसवलं

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Bigg Boss 19: प्रणित मोरेने अभिषेक बजाजच्या स्वप्नाचा केला चक्काचूर; सांगितलं अशनूर कौरला का केलं सेफ

Government Job: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची संधी; २९० पदांसाठी भरती; पगार मिळणार १,७७,५००; आजच करा अर्ज

Liver Infection: शरीराच्या या भागात वेदना होत असेल तर समजा लिव्हर खराब झालंय; इन्फेक्शनचे असतात हे संकेत

SCROLL FOR NEXT