राज्यमंत्री संजय बनसोडेंचं मिशन जिल्हा परिषद सुरु  दिपक क्षीरसागर
महाराष्ट्र

राज्यमंत्री संजय बनसोडेंचं मिशन जिल्हा परिषद सुरु

आता आगामी 8 महिन्यानंतर होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे.

दिपक क्षीरसागर

लातूर: राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे (NCP) नेते तथा राज्यमंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी लातूर जिल्ह्यातील (Latur District) रेणापूर येथे भेट देऊन पक्ष संघटनेबद्दल व आगामी निवडणुका संदर्भात चर्चा केली आहे. आता आगामी 8 महिन्यानंतर होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना याची रणनीती आखण्याचे आदेश दिल्याने इच्छुक उमेदवारांत बळ निर्माण झाले आहे.

राज्यमंत्री संजय बनसोडे हे आज रेणापूर मार्गे खरोळा येथे विवाह समारंभाला जात असताना येथील शिवाजी चौकात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार साळुंके तालुका कार्याध्यक्ष रुपेश चक्रे, शहर अध्यक्ष बालाजी कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी सत्कार केला.

यानंतर राज्यमंत्री बनसोडे यांनी तालुकाध्यक्ष नंदकुमार साळुंके यांच्यासह शहर व तालुक्यातील पदाधिका-या समवेत पक्ष संघटनेबद्दल व आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व रेणापूर नगरपंचायत निवडणुका संदर्भात चर्चा केली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत चव्हाण, युवक अध्यक्ष धनंजय चव्हाण, तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब पवार, प्रशांत भरबडे, किसन सभा अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, युवक शहर अध्यक्ष उत्तम चव्हाण, अत्तार वली गणेश कुराडे, सह रेणापूर तालुका व शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कोल्हापूर महानगर पालिका निवडणूक, जनसुराज्य शक्ती – आरपीआय – पीआरपी यांचा ‘सुराज्य संकल्प’ जाहीरनामा जाहीर

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT