Shinde Sena minister Gulabrao Patil addressing a public rally where he made the controversial ‘Lakshmi Darshan’ remark. Saam Tv
महाराष्ट्र

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Gulabrao Patil Cash Remark Reaction: नगरपरिषदेचं मतदान जसजसं जवळ येतंय तसं नेत्यांनी मतदारांना प्रलोभनं दाखवायला सुरूवात केलीय...आणि याचा नारळ सत्ताधारी मंत्र्यांनी फोडलाय...भाजप आणि राष्ट्रवादीनंतर आता शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी १ डिसेंबरला लक्ष्मीदर्शनासाठी तयार राहायला सांगितलंय...नेमकं कोणतं मालदार खातं आहे? आणि कोणता हा मंत्री आहे?

Snehil Shivaji

नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूकांसाठी मतदानाची तारिख जवळ आलीये. उमेदवारांची फोडाफोडी करून झाली आणि नेत्यांनी सत्ता मिळवण्यासाठी मतदारांना पैशाची प्रलोभनं दाखवायला सुरुवात केलीये. आणि तेही जाहिर सभेतून. भाजप आणि राष्ट्रवादीनंतर आता शिंदेसेनेच्या मंत्र्यांनीही पैशांची भाषा सुरू केलीय....पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी थेट लश्मीदर्शनाची भाषा केलीय...एवढंच नव्हे तर शिंदेंकडे असलेल्या नगविकास खात्यात किती माल आहे हेदेखील मतदारांना जाहिररित्या सांगितंलय.

गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावर बच्चू कडूंनी जोरदार प्रहार केलाय...मंत्र्यांना पैशांची मस्ती आल्याची टीका त्यांनी केलीय. तर उपमुख्यमंत्री शिंदेंनी सारवा सारव केली. विचारधारा सोडून सत्तेसाठी अनैसर्गिक युती आघाड्या, नंतर उमेदवारांची पळवापळवी त्यानंतर निधीची धमकी हे सर्व राज्यानं या निवडणुकीत पाहिलं...आता मतदारांना साद घालण्यासाठी थेट आता जाहिररित्या पैशांचं आमिष दाखवलं जातंय....त्यामुळे अशा बेलगाम नेत्यांची मस्ती निवडणूक आयोग जिरवणार की जनता याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई महापालिकेचा प्रचार, अदानींवरुन वॉर, मुंबई विमानतळाची जागा कुणाच्या घशात?

आम्हाला सत्ता द्या, दत्तक बाप उद्या यायला घाबरला पाहिजे; नाशिकमधून उद्धव ठाकरे कडाडले

Raj Thackeray: कल्याण-डोंबिवलीमधील ३ उमेदवारांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

घरातून बाहेर पडताना गोड पदार्थ खाऊन निघा; ५ राशींच्या लोकांना आयुष्यातील सर्वात मोठं यश मिळणार

Maharashtra Live News Update: भाजपने एमआयएमबरोबर युती केली, हिंदुत्वाचं काय? - उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT