Deepak Kesarkar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महायुतीचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिकच्या जागेचा तिढा कधी मिटणार? मंत्री दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Political News : महायुतीचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिकच्या जागेचा तिढ्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिकच्या जागेबाबत उद्या घोषणा होणार आहे, असं मंत्री दीपक केसरकर म्हणाले.

Vishal Gangurde

तबरेज शेख, नाशिक

नाशिक : महाविकास आघाडीने राज्यातील सर्व जागांवर उमेदवार जाहीर केलेले आहेत. मात्र, महायुतीचे अद्याप सर्व जागांवरील उमेदवार जाहीर झालेले नाहीत. महायुतीचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे. महायुतीचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिकच्या जागेचा तिढ्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिकच्या जागेबाबत उद्या घोषणा होणार आहे, असं मंत्री दीपक केसरकर म्हणाले.

मंत्री दीपक केसरकर आज नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी मंत्री दीपक केसरकरांनी महायुतीच्या जागावाटपावर भाष्य केलं. नाशिकच्या जागेवर भाष्य करताना मंत्री केसरकर म्हणाले, 'नाशिकमध्ये श्रीरामाचं धनुष्यबाण आम्हाला मिळेल असं मी गृहीत धरतो. एक विकासाची लाट संपूर्ण भारतामध्ये येत आहे. अनेक वस्तूस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. आपण जे बोलायचं ते सत्य बोलायचं, तुम्हाला उद्यापर्यंत थांबावं लागेल, उद्या आमची पत्रकार परिषद आहे'.

'महायुतीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद होईल, त्यात जागावाटपाबाबत घोषणा होईल. विकासाची लाट महाराष्ट्रात आलीच पाहिजे. तिन्ही पक्षांच्या वतीने मी स्वतः पत्रकार परिषद घेणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिकबाबत देखील उद्याच घोषणा होणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं ठरलेलं आहे. आमचे उद्या बरेचसे अर्ज भरले जाणार आहे. तेव्हा आम्ही उद्यापर्यंत संयुक्त सुरुवात करत आहोत, असे ते पुढे म्हणाले.

एकनाथ खडसे धमकी प्रकरणावर भाष्य करताना केसरकर म्हणाले, 'मला या गोष्टीची माहिती नाही. छोटा शकील असो नाहीतर मोठा शकील असो महाराष्ट्रात कोणालाही सोडणार नाही. महाराष्ट्राचा पोलीस दल सक्षम आहे. जगभरातील दहशतवादी टेन्शनमध्ये आहेत. त्यांचेच लोक त्यांना मारत आहे, त्यामुळे आधी त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, त्यानंतर खडसेंकडे पाहावे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Tanning Removal Tips: शरीरावर मळ जमा झालाय? मान, कोपर आणि गुडघ्यावरचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपा उपाय

Video : वाहतूक पोलिसाने मागितली ५ हजारांची लाच; मुंबईतील पोलीस खात्यात खळबळ

Shocking : दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना! १९ भाविकांचा मृत्यू; ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

SCROLL FOR NEXT