Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Latest News  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange News: छगन भुजबळांची 'ती' इच्छा कधीच पूर्ण होणार नाही; मनोज जरांगेंचा खोचक टोला

Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal: वादविवाद करणाऱ्यांना सदबुद्धी दे, असं साकडं देखील भुजबळ यांनी विठ्ठलांना घातलं. यावरुन जरांगे यांनी टीका केली आहे.

Satish Daud

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange News

"मराठा समाज आणि ओबीसी बांधवांमध्ये वादविवाद व्हावा, अशी मंत्री छगन भुजबळ यांची इच्छा आहे. पण, पिढ्यानपिढ्या कधीच दोन्ही समाजांमध्ये वाद झाला नाही. इथून पुढेही वाद होणार नाही, गावखेड्यातील ओबीसी आणि मराठा बांधव आताही एकत्र आहेत, तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही", असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना लगावला आहे. ते जालन्यात बोलत होते.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंढरपूरमध्ये आज ओबीसी बांधवांची जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal_ पंढरपुरात दाखल झाले असून त्यांनी विठुरायाचं दर्शन देखील घेतलं. वादविवाद करणाऱ्यांना सदबुद्धी दे, असं साकडं देखील भुजबळ यांनी विठ्ठलांना घातलं. यावरुन जरांगे यांनी टीका केली आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?

जालन्यात प्रसारमाध्यमांसोबत बोलताना मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले, "सध्या राज्यभरातील मराठा समाज एकवटला असून आंदोलनासाठी मुंबईकडे जाण्याच्या तयारीत आहेत. गोदापट्ट्यातील १२३ गावातील लाखो महिला २० जानेवारीला सकाळी मराठा आंदोलकांना वाटी लावण्यासाठी येणार आहेत", असं मनोज जरांगे म्हणाले.

"मराठा आरक्षणाची खिंड लढवण्यासाठी कोट्यवधी मराठा तरुण मुंबईसाठी निघणार आहे. पाठीमागच्या आंदोलनाची लढाई सांभाळण्यासाठी सुद्धा लाखो माता-भगिनी सज्ज आहेत. सरकारने शहाणपणाची भूमिका घेऊन सकारात्मक पद्धतीने मराठा आरक्षणावर तोडगा काढला तर बरं होईल, नसता आमचा नाईलाज आहे", असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.

पंढरपुरातील सभेआधी विठुरायाचं दर्शन घेत वादविवाद करणाऱ्यांना सदबुद्धी दे, असं साकडं मंत्री छगन भुजबळ यांनी घातलं. त्यावर बोलताना, घातलेलं साकडं त्यांनाच लागू होतं, ओबीसी बांधव आणि मराठा समाजामध्ये वादविवाद व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. पण ती कधीच पूर्ण होणार नाही, असा टोलाही जरांगे यांनी भुजबळ यांना लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT