मंत्री छगन भुजबळांचे हेलिकॉप्टर वेगळ्याच ठिकाणी उतरवण्यात आल्याची घटना घडली होती. पायलटनं हेलिपॅडऐवजी कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर का उतरवलं याची धक्कादायक कारण समोर आले आहे. मंत्री छगन भुजबळ हे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील खानवाडी येथे जात होते.
मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर लँडिंग करताना पायलटकडून मोठी चूक झाली. नियोजित हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्याऐवजी पायलटने ते थेट कार पार्किंगच्या जागेत हेलिकॉप्टर उतरवले, यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी पायलटला त्याच्या चुकीबद्दल माहिती दिली, तेव्हा हेलिकॉप्टर त्या ठिकाणाहून हटवण्यात आले.
या घटनेनंतर स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. योग्य नियोजन असतानाही चुकीच्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवणे अत्यंत धोकादायक असून लोकवस्तीच्या जवळ अशा प्रकारचा चुकीमुळे मोठा अनर्थ घडू शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान या घटनेनंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. हा अपघात वगैरे काही नाही असं भुजबळ म्हणालेत. पायलटनं हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी कर पार्किंगमध्ये का उतरवलं याची माहिती देताना भुजबळ म्हणाले की, पायलटला हेलिपॅड दिसलं नाही, त्यामुळे कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर लँडिंग केलं. तेही अगदी सुरक्षितपणे. आम्ही सर्वजण सुरक्षितपणे त्यातून उतरलो, असं भुजबळ म्हणाले.
दरम्यान, याप्रकरणी रोहित पवार यांनी ट्विट करत प्रवास करताना काळजी घ्या,असा सल्ला दिला आहे. छगन भुजबळ साहेब यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं हेलीकॉप्टर अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याची बाब ही अतिशय गंभीर आहे. त्यामुळेच मी सातत्याने सांगतोय, महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रवास करताना काळजी घ्यायला हवी. अनेक विमानं आणि हेलिकॉप्टरर्समध्ये देखभाल दुरुस्तीसह इतरही अनेक त्रुटी आहेत. आज सुदैवाने अपघात टळला पण म्हणून शासनानेही एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाही. असं रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.