Chhagan Bhujbal vs Sharad Pawar Saam TV
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: शरद पवारांवरील टीकेनंतर बीडच्या सभेत गोंधळ; भुजबळांनी दोन मिनिटातच भाषण संपवलं, नेमकं काय घडलं?

Chhagan Bhujbal vs Sharad Pawar: शरद पवारांवर जहरी टीका सुरू करताच गर्दीतून प्रचंड आरडाओरड झाल्याने भुजबळांना अखेर आपले भाषण आवरते घ्यावे लागले.

Satish Daud

Chhagan Bhujbal vs Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने रविवारी बीडमध्ये जंगी सभा घेतली. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. यावेळी छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. मात्र, त्यांच्या भाषणादरम्यान सभेत चांगलाच गोंधळ उडाला. (Latest Marathi News)

शरद पवारांवर जहरी टीका सुरू करताच गर्दीतून प्रचंड आरडाओरड झाल्याने भुजबळांना अखेर आपले भाषण आवरते घ्यावे लागले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र शरद पवारांविरुद्ध कुठलेही भाष्य न करता दुष्काळी परिस्थितीवरच बोलणे पसंत केले.

बीडमधील राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी या सभेसाठी मोठी गर्दी जमवली होती. दुपारी तीन वाजता ही सभा होणार होती. मात्र प्रत्यक्षात या सभेला सायंकाळी ६ वाजता सुरूवात झाली. सभेची सुरुवात करताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून शरद पवारांना लक्ष्य केले.

धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपले भाषण सुरू केले. मात्र, धनंजय मुंडेंचं भाषण संपताच काही जणांनी घरची वाट धरली. सभेमधील गर्दी कमी होत असल्याचं लक्षात येताच मुंडे यांनी हात जोडून शेवटपर्यंत सभा न सोडण्यासाठी विनंती केली. त्यामुळे कार्यकर्ते थांबले.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभेच्या शेवटी भाषण केलं. यावेळी त्यांनी मात्र शरद पवारांविरुद्ध कुठलेही भाष्य न करता दुष्काळी परिस्थितीवरच बोलणे पसंत केले. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र ट्वीट केलं.

बीडकरांना सलाम! आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात ऐकून घेणार नाही, ही तुम्हा बीडकरांची भूमिका होती; त्याबद्दल तुम्हांला मानाचा मुजरा!!ज्यांचं खाल्लं, प्यायलं... त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढत आहेत. असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT